विदर्भ रणजी
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:33+5:302015-01-22T00:07:33+5:30
पोवारच्या फिरकीपुढे विदर्भ गारद

विदर्भ रणजी
प वारच्या फिरकीपुढे विदर्भ गारदरणजी सामना : गुजरातविरुद्ध शलभची एकाकी झुंजसूरत : अनुभवी ऑफ स्पिनर रमेश पोवार याच्या भेदक फिरकी माऱ्यापुढे विदर्भाच्या फलंदाजांनी शरणागती पत्करल्यामुळे बुधवारपासून येथे सुरू झालेल्या सहाव्या रणजी सामन्यात विदर्भाने गुजरातविरुद्ध पहिल्या डावात सर्वगडी गमावून केवळ २३६ धावा केल्या. शलभ श्रीवास्तवची खेळी मात्र अपवाद ठरली. त्याने एकाकी किल्ला लढवित नाबाद ९५ धावा केल्या पण अन्य फलंदाजांची त्याला साथ मिळू शकली नाही. गुजरातने दिवसअखेर बिनबाद ३९ अशी झकास सुरुवात केली. समित पटेल १३ आणि प्रियांक पांचाळ २१ धावांवर खेळत होते. पोवारने ८७ धावा देत विदर्भाचा अर्धा संघ बाद केला. रुजुल भट याने ३१ धावांत दोन गडी बाद केले.विदर्भाने नाणेफेकीचा कौल बाजूने येताच फलंदाजी घेतली. पण त्यांचा हा निर्णय फसवा ठरला. शलभ श्रीवास्तव वगळता एकही फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावू शकला नाही. दुसऱ्या टोकाहून साथ न मिळू शकल्याने श्रीवास्तवचे शतक देखील हुकले. त्याने १४४ चेंडू टोलवले. त्यात दहा चौकार आहेत. गणेश सतीश याने ३४ आणि राकेश धृव याने २९ धावा करीत काही वेळ प्रतिकार केला.