स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ गर्जना यात्रा
By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:18+5:302015-02-06T22:35:18+5:30
नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी सिंधखेडराजा ते गडचिरोली अशा विदर्भ गर्जना यात्रेला १५ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. १५ फेब्रुवारीला गांधी पुतळा, व्हेरायटी चौकातून यात्रेला सुरुवात होईल.

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ गर्जना यात्रा
न गपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी सिंधखेडराजा ते गडचिरोली अशा विदर्भ गर्जना यात्रेला १५ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. १५ फेब्रुवारीला गांधी पुतळा, व्हेरायटी चौकातून यात्रेला सुरुवात होईल. यात्रा नागपूर येथून मार्गक्रमण करीत अमरावती, वाशिम जिल्ह्यातून फिरून बुलडाणा जिल्ह्यातील जिजामातेचे जन्मस्थान सिंदखेड राजा येथे जाईल. तेथून अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, जिल्ह्यातून फिरून गडचिरोलीला जाईल. ३ मार्चला गडचिरोली येथे यात्रेचा समारोप होईल. १७ दिवसांच्या प्रचार यात्रेमध्ये १०० लहानमोठ्या जनसभा होणार आहेत. यातून स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी जनजागरण करण्यात येईल. समितीतर्फे सदस्य नोंदणी व संघटनात्मक बांधणी करण्यात येईल. प्रचार यात्रा यशस्वी करण्यासाठी जिल्हावार बैठका घेऊन नियोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री विदर्भाच्या विकासाची भाषा करतात, ही वैदर्भीय जनतेची शुद्ध फसवणूक आहे. महाराष्ट्रावर ३ लाख ४४ हजार कोटी रुपये जागतिक बँकेचे कर्ज आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती कर्मचाऱ्यांना पगार देण्याइतपत चांगली नाही. अशा महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास होणे नाही. ही परिस्थिती जनतेपुढे मांडण्यासाठी गर्जना यात्रा काढण्यात येणार आहे.