विदर्भासाठी - युसीएनवर कारवाई -१

By Admin | Updated: March 25, 2015 21:10 IST2015-03-25T21:10:03+5:302015-03-25T21:10:03+5:30

For Vidarbha - Action on UCN- 1 | विदर्भासाठी - युसीएनवर कारवाई -१

विदर्भासाठी - युसीएनवर कारवाई -१

> युसीएनवर कारवाईने केबल प्रसारण ठप्प
३० कोटीपेक्षा अधिक कर थकीत : सेमिफायनल मॅच पूर्वी प्रसारण बंद पडल्याने ग्राहकांमध्ये असंतोष

नागपूर :
करोडो रुपयांचा करमणूक कर थकीत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभागाच्या चमूने यूसीएन केबल नेटवर्कच्या रामदासपेठ येथील कार्यालयाला सील ठोकले. ही कारवाई बुधवारी दुपारी २.३० वाजता झाली. यानंतर युसीएन केबल प्रसारण ठप्प पडले.
मिळालेल्या माहितीनुसार युसीएन केबल नेटवर्कवर १ एप्रिल २०१३ पासून आतापर्यंत ३० कोटी रुपयापेक्षा अधिक करमणूक कर थकीत आहे. थकीत कर भरण्यासाठी प्रशासनातर्फे अनेकदा सांगण्यात आले. वारंवार सूचना देण्यात आली. परंतु त्याला गांभीर्याने घेण्यात आले नाही. शेवटी बुधवारी करमणूक कर विभागाच्या एक पथकाने युसीएनच्या कार्यालयाला सील ठोकले. यानंतर नागपूर शहरासह विदर्भातील बहुतांश भागातील युसीएनचे प्रसारण ठप्प पडले होते.

बॉक्स...
प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
बुधवारी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे केबल ऑपरेटरमध्ये खळबळ उडाली तर दुसरीकडे केबल ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. सध्या क्रिकेटचा वर्ल्ड कप सुरू आहे. गुरुवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सेमिफायनलचा सामना खेळला जाणार आहे. अशा परिस्थितीत ही कारवाई केली असल्याने ग्राहक संतापले आहे. मागील दोन वर्षांपासून करोडो रुपयांचा कर थकीत होता तेव्हा प्रशासन झोपले होते का? प्रशासनाची ही कारवाई ग्राहकांवर अन्याय करणारी आहे. कारण ग्राहकांकडून दर महिन्याला केबलचे शुल्क वसूल केले जात आहे. तेव्हा अचानकपणे प्रसारण थांबविण्याचे कारण काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Web Title: For Vidarbha - Action on UCN- 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.