समाजकंटकांनी जाळल्या दुचाक्या

By Admin | Updated: August 11, 2015 23:45 IST2015-08-11T23:45:08+5:302015-08-11T23:45:08+5:30

नागपूर : गेल्या तीन दिवसात विविध भागात समाजकंटकांनी सात दुचाक्या पेटवून दिल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. सोमवारी मध्यरात्री समाजकंटकांनी विवेकानंदनगरातील तीन दुचाक्या जाळल्या.

The victims were burnt by the miscreants | समाजकंटकांनी जाळल्या दुचाक्या

समाजकंटकांनी जाळल्या दुचाक्या

गपूर : गेल्या तीन दिवसात विविध भागात समाजकंटकांनी सात दुचाक्या पेटवून दिल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. सोमवारी मध्यरात्री समाजकंटकांनी विवेकानंदनगरातील तीन दुचाक्या जाळल्या.
नितीन राय, आशिष राय तसेच आकाश कुकरेजा (विवेकानंदनगर, धंतोली) यांनी आपापल्या दुचाक्या सोमवारी रात्री पार्किंगमध्ये ठेवल्या होत्या. मंगळवारी पहाटे या तीनही दुचाक्या जळाल्याचे दिसून आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अशाच प्रकारे नवी शुक्रवारी निवासी मयूर माने आणि तेलीपुरा येथील दुर्गेश सुधीर तलमले यांच्या दुचाक्यांनाही शनिवारी मध्यरात्री आग लावण्यात आली होती. रविवार रात्री खामला परिसरातही दोन मोटरसायकली जाळण्यात आल्या. तीन दिवसात सात दुचाक्या जाळण्यात आल्यामुळे दुचाकीमालकांसह पोलिसही चक्रावले आहेत.
---

Web Title: The victims were burnt by the miscreants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.