राजगुरुनगरच्या भीमा नदीच्या पात्रात तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: March 23, 2015 16:54 IST2015-03-23T16:54:50+5:302015-03-23T16:54:50+5:30
राजगुरुनगर : अज्ञात तरुणीने विषारी औषध पिऊन, पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगरच्या भीमा नदीच्या पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु तीन धाडसी तरुणांनी नदीत उड्या घेऊन तिला बाहेर काढले.

राजगुरुनगरच्या भीमा नदीच्या पात्रात तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
र जगुरुनगर : अज्ञात तरुणीने विषारी औषध पिऊन, पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगरच्या भीमा नदीच्या पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु तीन धाडसी तरुणांनी नदीत उड्या घेऊन तिला बाहेर काढले. दुपारी साडेबाराच्या सुमारास एक तरुणी पुलाच्या मध्यभागी गेली आणि तिने पुलावरून नदीपात्रात उडी घेतली. ही घटना पाहणार्यांपैकी तीन तरुणांनी लगेच पाण्यात उड्या घेतल्या आणि तिला पाण्याच्या पृष्ठभागी आणले. तोपर्यंत पुलावरून इतर वाहनचालकांनी ट्रक आणि टेम्पोला दोर्या बांधून खाली सोडल्या. नदीतील तरुणांनी तिला दोरीने बांधले आणि वरून लोकांनी खेचून बाहेर काढले. बाहेर आल्यावर तिला निळसर रंगाच्या उलट्या झाल्या. त्यावरून तिने विष पिल्याचे लक्षात आले. ती बेशुद्ध पडली. त्यानंतर ताबडतोब तिला चाकणच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संध्याकाळी उशिरापर्यंत तिची ओळख समजली नव्हती. दरम्यान, या सगळ्या प्रकारामुळे आणि बघ्यांनी तुडुंब गर्दी केल्याने महामार्गावरची वाहतूक दोन तास ठप्प झाली. ०००००