पूर्वप्रेयसीचा व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकणा-या युवकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2016 08:37 IST2016-07-03T08:29:04+5:302016-07-03T08:37:49+5:30

पूर्वप्रेयसी सोबतचे शारीरीक संबंधांचे व्हिडीओ पॉर्न वेबसाईटवर अपलोड करणा-या युवकाला हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती.

The victim was arrested on the porn video on the porn video | पूर्वप्रेयसीचा व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकणा-या युवकाला अटक

पूर्वप्रेयसीचा व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकणा-या युवकाला अटक

ऑनलाइन लोकमत 

हैदराबाद, दि. ३ - पूर्वप्रेयसी सोबतचे शारीरीक संबंधांचे व्हिडीओ पॉर्न वेबसाईटवर अपलोड करणा-या युवकाला हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती. बी.रुपेश (२७) असे या युवकाचे नाव असून तो इंजिनीयरींग शाखेचा पदवीधर आहे. पूर्वप्रेयसीवरच्या रागातून त्याने दोघांचे अंतरंग क्षणांचे शूट केलेले व्हिडीओ पॉर्न साईटवर अपलोड केले. 
 
शनिवारी त्याला हैदराबाद पोलिसांनी अटक केली. रुपेशच्या पूर्वप्रेयसीने त्याला सोडून दुस-याबरोबर लग्न केले म्हणून रुपेश तिला त्रास देत होता. पिडित तरुणीची प्रतिमा मलिन करण्यासाठी म्हणून त्याने या व्हिडीओची सीडीही पोस्टाने तिच्या सासरी पाठवून दिली. 
 
रुपेश आणि पिडित तरुणी गुंटूर जिल्ह्यातील ताडेपालीचे निवासी असून, ते इंजिनियरींगच्या शाखेमध्ये एकत्र शिक्षण घेत होते. त्यावेळी त्यांची ओळख आणि पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. ते दोघे लग्नही करणार होते. पण पिडित तरुणीला रुपेशच्या स्वभावातील काही गोष्टी खटकल्या व तिने रुपेशची साथ सोडून दुस-याबरोबर लग्न केले. याच राग रुपेशच्या मनात होता. 
 
पिडित तरुणीला या व्हिडीओची माहिती मिळाल्यानंतर तिने सायबर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तक्रारीवरुन रुपेशला अटक केली.  पण नंतर त्याची जामिनावर सुटका झाली. शनिवारी रुपेशला त्याच्या पालकांसमोर बसवून समुपदेशनाचा सल्ला देण्यात आला. संबंधित व्हिडीओ पोलिसांनी नेटवरुन डिलीट केले आहेत. 
 

Web Title: The victim was arrested on the porn video on the porn video