वादळाने घेतला महिलेचा बळी

By Admin | Updated: June 12, 2015 01:52 IST2015-06-12T01:52:19+5:302015-06-12T01:52:19+5:30

गाय-वासरूही दगावले : एक गंभीर

The victim is the victim of the woman | वादळाने घेतला महिलेचा बळी

वादळाने घेतला महिलेचा बळी

य-वासरूही दगावले : एक गंभीर
नागपूर : गुरुवारी सायंकाळी आलेल्या वादळाने एका महिलेचा बळी घेतला. गाय आणि वासरूही दगावले तर मृत महिलेचा पती गंभीर जखमी झाला. टेकानाका, सिद्धार्थनगर परिसरात ही घटना घडली.
मृत महिलेचे नाव सुनीता सोहन यादव (वय ३५) आहे. ती गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास आपल्या टिनाच्या शेडमध्ये जनावरांना पाणी पाजत होती. वादळामुळे तिच्या घरावरची विजेची तार तुटली आणि टिनाच्या शेडला करंट आला. सुनीताला आणि तिच्या बाजूला असलेल्या गाय-वासरालाही करंट लागला. त्यामुळे ते मृत्युमुखी पडले. तर, मदतीला धावलेला सुनीताचा पती सोहन यादव करंट लागल्याने बेशुद्ध पडला. त्याला मदन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
----

Web Title: The victim is the victim of the woman