शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

सत्यपालसिंगाचा मुक्काम अन् व्यवस्थापकांचा बळी

By admin | Updated: July 26, 2014 01:31 IST

उत्तरप्रदेशचे भाजपा खासदार सत्यपालसिंग यांच्या महाराष्ट्र सदनातील शाही मुक्कामाची सोय तत्कालिन अप्पर निवासी आयुक्त नितीन गायकवाड यांनी केली

रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
उत्तरप्रदेशचे भाजपा खासदार सत्यपालसिंग यांच्या महाराष्ट्र सदनातील शाही मुक्कामाची सोय तत्कालिन अप्पर निवासी आयुक्त नितीन गायकवाड यांनी केली असून, आपल्याला या प्रकरणी कारणो दाखवा नोटीस आणि रात्रीतून मुंबईत बदली करण्याचे कारस्थान गायकवाड यांच्या मर्जीमुळे निवासी आयुक्त बिपीन मलीक यांनी केल्याची सनसनाटी तक्रार सदनाचे व्यवस्थापक सुहास ममदापूरकर यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. 
या प्रकरणाचीही चौकशी आता मुख्य सचिव करणार असल्याचे सूत्रंनी सांगितले. शुक्रवारी मुख्यसचिव ज.स.सहारिया चौकशीसाठी येणार होते. पण सायंकाळी ते येणार नसल्याचे स्पष्ट झाले. तर आयआरसीटीसीने नेमलेल्या तीन सदस्यीय चौकशी समितीने दुपारी सदनात येऊन चौकशी केल्याचे सांगण्यात आले. ही चौकशी अत्यंत गुप्त पध्दतीने करकण्यात येत आहे. शिवसेनेच्या काही खासदारांना त्याबाबत समितीने बोलावलेही होते पण त्यांनी लेखी देऊ असे सांगितले. तथापि, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी असे कोणतेही बोलावणो आले नसल्याचे सांगितले. 
मुख्यमंत्र्यांकडे ममदापूरकर यांनी पाठविले पत्र अत्यंत स्फोटक आहे. मलिक यांनी त्यांचा केलेला पाणउतारा या पत्रचे कारण असल्याचे सांगण्यात आले. तर गायकवाड प्रतिनियुक्ती संपल्याने मुंबईत अवर सचिव म्हणून बदली झालेले गायकवाड यांना पुन्हा सदनात आणण्याचा खटाटोप स्वत: मलिक करत असल्याने आपल्या कोणतेही कारण नसताना कारणो दाखवा नोटीस बजावली व रात्री नऊ वाजता बदली झाल्याचे सांगण्यात आले. ममदापूरकर यांच्या पत्रत म्हटले आहे, की 26 मे रोजी सदनाचे व्यवस्थापक म्हणून रूजू झालो. मात्र सदनातील कक्ष वितरणाचे संपूर्ण अधिकार तेव्हाचे अप्पर निवासी आयुक्त नितीन गायकवाड यांना होते. 
 खा.सत्यपालसिंग यांना सदनात कक्ष द्यावा असे पत्र लोकसभा सचिवालयाने सदनाला तीन जून रोजी दिले. मात्र त्यापूर्वीच म्हणजे, 31 मे रोजी दुपारी एक वाजता सत्यपालसिंग यांना कक्ष बहाल करण्यात आला होता. मात्र कारणो दाखवा नोटीस देऊन आपली तात्काळ प्रभावाने मूळ पदावर मुंबई येथे बदली करण्यात आली. ममदापूरकर हे मंत्रलयात कक्ष अधिकारी असून, ते सदनात येण्यापूर्वी पर्यावरणमंत्री  संजय देवतळे यांचे स्वीयसचिव होते. प्रतिनियुक्तीवरील  बदली करताना तीन महिन्याची नोटीस द्यावीलागते, मात्र असे न करता मनमानी पध्दतीने बदली करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याबाबत निवासीआयुक्त बिपीन मलिक यांच्याशी संपर्क केला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. तर ममदापूरकर म्हणाले.
 
च्मुख्यसचिवासह, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवांनाही त्यांनी सत्यपालसिंग प्रकरणी आपला कसा बळी देण्यात आला, याची वस्तुस्थिती सदनातील याबाबतच्या सर्व कागदपत्रंचा हवाला देऊन सांगितली आहे.