शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 09:15 IST

Vice President Election 2025: रविवारी एनडीएची एक महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार निश्चित केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

Vice President Election 2025: जगदीप धनखड यांनी अचानकपणे दिलेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. जगदीप धडखड यांनी प्रकृतीच्या कारणामुळे उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. जगदीप धनखड यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्त झाले. उपराष्ट्रपतीपदाच्या रिक्तपदासाठी ०९ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी एनडीएकडून कोण उमेदवार असेल, याबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार निश्चित केला जाणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा संसदीय मंडळाची रविवारी बैठक होणार आहे, यामध्ये पक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे नाव अंतिम करण्यात येणार आहे. एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार २१ ऑगस्ट रोजी आपला अर्ज दाखल करतील, असे म्हटले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आगामी उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवाराचे नाव निश्चित करतील. संसद भवनात झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबत माहिती दिली होती.

अर्ज दाखल करण्यासाठी २१ ऑगस्ट ही शेवटची तारीख

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार  आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २१ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी रविवारी एनडीएकडून उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे. गुजरातचे राज्यपाल आचार्च देवव्रत यांना भाजपाकडून संधी दिली जाऊ शकते. मात्र याबाबत अद्याप अधिकृत अशी माहिती समोर आलेली नाही. 

दरम्यान, जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, शिवसेना नेते श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल, चिराग पासवान, उपेंद्र कुशवाह, राम मोहन, लल्लन सिंग, अपना दल (एस) नेत्या अनुप्रिया पटेल आणि रामदास आठवले यांच्यासह एनडीएचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते.

 

टॅग्स :National Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीBJPभाजपाPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीJ P Naddaजगत प्रकाश नड्डा