शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 13:44 IST

संसदेत लोकशाही सर्वोच्च आहे असा पुनरुच्चार उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केला.

Vice President Jagdeep Dhankhar on SC: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सर्वोच्च न्यायालयावर केलेल्या विधानावरुन त्यांच्यावर टीका होत असतानाही ते आपल्या मतावर ठाम आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयकांना मान्यता देण्यासाठी अंतिम मुदत दिली होती. त्यानंतर जगदीप धनखड यांनी न्यायालये राष्ट्रपतींना आदेश देऊ शकत नाहीत असे म्हटलं होतं. जगदीप धनखड यांच्या विधानावर विरोधकांनी रोष व्यक्त केल्यानंतरही त्यांनी पुन्हा एकदा उघडपणे आपले मत व्यक्त केले. संसदेत लोकशाही सर्वोच्च आहे असा पुनरुच्चार जगदीप धनखड यांनी केला.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पुन्हा एकदा न्यायव्यवस्थेच्या भूमिकेवर आणि मर्यादांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.  संसद सर्वोच्च आहे आणि संविधान कसे असेल हे ठरवण्याचा अंतिम अधिकार प्रतिनिधींना (खासदारांना) आहे, त्यांच्यापेक्षा कोणीही वर असू शकत नाही, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले. राज्यपालांकडे प्रलंबित असलेल्या तामिळनाडू विधानसभेने मंजूर केलेल्या अनेक विधेयकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले होतो. त्यांच्या वक्तव्यावर काही लोकांकडून टीका केली जात उपराष्ट्रपतींनी हे विधान केले आहे.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज दिल्ली विद्यापीठातील एका कार्यक्रमात बोलत होते."संसद ही देशातील सर्वात मोठी संस्था आहे आणि संविधान कसे असेल हे निवडून आलेले खासदार ठरवतील. कोणतीही संस्था संसदेपेक्षा वर असू शकत नाही. एकदा न्यायालयाने म्हटले की संविधानाची प्रस्तावना हा त्याचा भाग नाही, तर दुसऱ्या वेळी म्हटले की प्रस्तावना ही संविधानाचा भाग आहे," असे जगदीप धनखड म्हणाले. 

लोकशाहीमध्ये संवाद आणि खुली चर्चा खूप महत्त्वाची आहे. जर लोक गप्प राहिले तर त्यामुळे नुकसान होऊ शकते असे धनखड यांनी म्हटलं. "संवैधानिक पदांवर असलेल्या लोकांनी नेहमीच संविधानानुसार बोलले पाहिजे. आपल्या संस्कृतीचा आणि भारतीयतेचा अभिमान बाळगायला हवा. देशात अशांतता, हिंसाचार आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे योग्य नाही. गरज पडल्यास कठोर पावलेही उचलली पाहिजेत," असेही जगदीप धनखड म्हणाले.

टॅग्स :jagdeep dhankharजगदीप धनखडSupreme Courtसर्वोच्च न्यायालयParliamentसंसद