शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
2
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
3
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
5
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी
6
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
7
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
8
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
9
IND vs WI : जॉन कॅम्पबेलची विक्रमी सेंच्युरी! जे लाराला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
10
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
11
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
12
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
13
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
14
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
15
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!
16
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
17
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
18
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
19
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
20
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 15:06 IST

Vice President Election : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी फक्त दोन उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

Vice President Election : भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर या पदासाठी लवकरच निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी एनडीएकडून सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी यांनी अर्ज दाखल केला आहे. या दोघांसोबत एकूण ६८ अर्ज दाखल करण्यात आले. मात्र, या अर्जाच्या छाननीदरम्यान खासदारांची बनावट स्वाक्षरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

२१ ऑगस्ट ही उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी नामांकनाची शेवटची तारीख होती. तोपर्यंत ४६ उमेदवारांनी ६८ नामांकन अर्ज दाखल केले. सुरुवातीला १९ उमेदवारांचे २८ अर्ज नाकारण्यात आले. उर्वरित २७ उमेदवारांच्या ४० अर्जांची छाननी २२ ऑगस्ट रोजी करण्यात आली. यादरम्यान, केरळच्या जोमोन जोसेफ यांच्या नामांकनाबाबत बनावट स्वाक्षरीचा प्रकार समोर आला आहे. 

अर्जावर खासदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या वापरण्यात उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जांपैकी फक्त दोन अर्ज वैध आहेत. हे अर्ज सी पी राधाकृष्णन आणि बी सुदर्शन रेड्डी यांचे आहेत. परंतु जोसेफ यांच्या अर्जाच्या छाननीदरम्यान, बनावट स्वाक्षरीचा प्रकार उघडकीस आला. जोसेफ यांच्या अर्जाला २२ प्रस्तावक आणि २२ समर्थकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची नावे आणि स्वाक्षऱ्यांचा समावेश आहे.

मात्र, हा अर्ज नाकारण्यात आला आहे. या खासदारांची नावे त्यांना न कळवता लिहिली असून, स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. अनेक खासदारांनी पुष्टी केली की, त्यांनी जोसेफ यांच्या अर्जावर स्वाक्षरी केलीच नाही. विशेष म्हणजे, यामध्ये सध्या तुरुंगात असलेले वायएसआरसीपीचे खासदार मिधुन रेड्डी यांची स्वाक्षरी देखील दिसून येते. बहुतांश अर्जदारांचे अर्ज नाकारल्यामुळे या निवडणुकीत फक्त दोन उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे.

निवडणूक कधी होणार आहे?

देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी आरोग्याच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेण्याची घोषणा केली. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान ९ सप्टेंबर रोजी होणार आहे आणि त्याच दिवशी देशाला नवीन उपराष्ट्रपती मिळतील. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट होती, तर २५ ऑगस्टपर्यंत नावे मागे घेता येतील.

टॅग्स :jagdeep dhankharजगदीप धनखडPresidentराष्ट्राध्यक्षElectionनिवडणूक 2024BJPभाजपाcongressकाँग्रेस