शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींना मोठा धक्का, तापस रॉय यांनी दिला राजीनामा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 16:02 IST

Tapas Roy : राज्य सरकारमधील मंत्री तापस रॉय हे बऱ्याच दिवसांपासून तृणमूल काँग्रेसवर नाराज होते.

Tapas Roy : (Marathi News) कोलकाता : लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तापस रॉय यांनी सोमवारी पक्षाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत पक्षाचा आणि आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. येत्या काही दिवसांत देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत तापस रॉय यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ते आता भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

तापस रॉय म्हणाले, "मी आमदार पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. मी आता एक मुक्त पक्षी आहे.'' दरम्यान, पत्रकारांशी बोलताना तापस रॉय यांनी जानेवारीत त्यांच्या निवासस्थानावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकला होता, तेव्हा पक्ष आपल्या पाठीशी उभा राहिला नाही, अशी टीका त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या पक्षनेतृत्वावर केली. याचबरोबर, तापस रॉय म्हणाले, गेल्या 25 वर्षांपासून मी पक्षाचा प्रामाणिक नेता आहे, पण मला कधीच माझे हक्क मिळाले नाहीत."

राज्य सरकारमधील मंत्री तापस रॉय हे बऱ्याच दिवसांपासून तृणमूल काँग्रेसवर नाराज होते. त्यामुळेच त्यांच्या राजीनाम्याची चर्चा राजकीय वर्तुळात वर्तविली जात होती. याआधी सोमवारी तृणमूल काँग्रेस नेते कुणाल घोष आणि ब्रत्य बसू यांनी तापस रॉय यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती, पण या भेटीचा काहीही परिणाम झाला नाही. अखेर तापस रॉय यांनी राजीनामा दिला. तसेच, राजीनामा दिल्यानंतर त्यांना भाजपामध्ये प्रवेश करण्याबाबत विचारले असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपा