शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Chalapathi Rao : तेलुगू सिनेसृष्टीवर पसरली शोककळा; विनोदी अभिनेते चलपती राव यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 15:46 IST

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते चलपती राव (Chalapathi Rao) वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

Chalapathi Rao : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते चलपती राव (Chalapathi Rao) वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयानुसार गेल्या काही दिवसांपासून अनेक आजारांशी ते झुंज देत होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

विनोदी ते थेट खलनायकाची भुमिका उत्तमपणे साकारणारे चलपती राव तेलुगू सिनेमातील महत्वाचा चेहरा होते. त्यांचे विनोदाचे टायमिंग तर जबरदस्तच होते. त्यांनी जवळपास ६०० चित्रपटांत काम केले आहे. रवी तेजा, एनटी रामराव, कृष्णा, अक्किनेनी नागार्जुन, चिरंजीवी आणि व्येंकटेश अशा अनेक सुपरस्टार सोबत काम केले आहे.तर बॉलिवुडमध्येही त्यांनी सलमान खानच्या किक (Kick) मध्ये काम केले होते. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे.

चलपती राव हे आंध्र प्रदेशच्या बालिपरु मध्ये वास्तव्यास होते. त्यांचा मुलगा रवि बाबू देखील एक अभिनेता आहे. राव यांनी साक्षी(Sakshi), ड्राइ्व्हर रामुडू, वज्रम (Vajram), वीरा (Veera) सारख्या हिट चित्रपटात काम केले आहे. त्यांची मुलगी ही अमेरिकेहून परतणार असल्याने चलपती राव यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

दोनच दिवसांपूर्वी तेलगु सिनेमातील दिग्गज अभिनेते कैकला सत्यनारायण (Kaikala Satyanarayana) यांनी जगाचा निरोप घेतला. हैदराबाद येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज चलपती राव यांच्या निधनाने तेलगु चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :cinemaसिनेमा