शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

काँग्रेसच्या दिग्गज नेत्याने बागेश्वर धाममध्ये जाऊन घेतली धीरेंद्र शास्त्रींची भेट, हिंदुराष्ट्राबाबत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 14:35 IST

Congress: मध्य प्रदेशमधील छतरपूर येथे असलेल्या बागेश्वर धाममध्ये आजपासून सुरू झालेल्या धर्म रक्षार्थ यज्ञ आणि भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी आयोजित यज्ञाला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी उपस्थिती लावली

मध्य प्रदेशमधील छतरपूर येथे असलेल्या बागेश्वर धाममध्ये आजपासून सुरू झालेल्या धर्म रक्षार्थ यज्ञ आणि भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी आयोजित यज्ञाला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी उपस्थिती लावली.   पन्ना जिल्ह्यातील अजयगड येथे जाण्याआधी बागेश्वर धाममध्ये असलेल्या हेलिपॅडवर उतरले. तिथे काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर बालाजी हनुमानांचे दर्शन घेतले. तसेच यादरम्यान त्यांनी बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर कमलनाथ यांना धीरेंद्र शास्त्री येथे हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी यज्ञ करत आहेत, असा प्रश्न विचारला असता कमलनाथ यांनी भारत हा राज्यघटनेनुसार चालतो, असे स्पष्टपणे सांगितले.

मध्य प्रदेशमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे सातत्याने मंदिरांचा दौरा करत आहेत. हल्लीच त्यांनी राज्यातील पुजाऱ्यांच्या वेतनावरून राज्य सरकारवर हल्ला केला होता. तसेच जबलपूर येथील ग्वारीघाट येथे माता नर्मदेची पूजा केली होती. राजकीय दृष्ट्या हा दौरा खूप महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कारण या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यावेळी भाजपाच्या हिंदुत्वाला प्रत्युत्तर देण्याचा कमलनाथ यांचा प्रयत्न आहे.

सध्या बागेश्वर धाममध्ये सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे. येथील धार्मिक कार्यक्रम हे १९ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये २१ कथावाचक आणि भजनगायक भाग घेणार आहेत. तसेच येथे दर्शनासाठी नेतेमंडळीही येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज बागेश्वर धाम येथे आलेल्या कमलनाथ यांनी बागेश्वर बालाजी मंदिरात पूजा केली. धीरेंद्र शास्त्री यांनी कमलनाथ यांना कन्या विवाहाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते.  

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेस