वयोवृद्ध सासूला सुनेने विटेने केली अमानुष मारहाण
By Admin | Updated: January 12, 2016 14:41 IST2016-01-12T13:48:00+5:302016-01-12T14:41:56+5:30
योवृद्ध सासूला सुनेने विटेच्या सहाय्याने अमानुष मारहाण केल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.

वयोवृद्ध सासूला सुनेने विटेने केली अमानुष मारहाण
ऑनलाइन लोकमत
बिजनौर, दि. १२ - वयोवृद्ध सासूला सुनेने विटेच्या सहाय्याने अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याप्रकरणी संगीता जैन या महिलेला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथे ही खळबळजनक घटना घडली असून पत्नीकडून आईचा छळ होतोय का हे पाहण्यासाठी संगीत यांच्या नव-यानेच घरात गुप्तपणे लावलेल्या सीसीटीव्ही क२मे-यामध्ये ही मारहाण कैद झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते कुंदन श्रीवास्तव यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला होता आणि याप्रकरणी संगीत जैन हिच्याविरोधात कडक कारवाई करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली होती.
एक मिनिटांच्या कालावधीच्या या व्हिडीओत संगीता जैन ही महिला तिची सासू, राजराणी जैन (वय ७०) यांना मारहाण करताना दिसत आहे. पाच जानेवारी रोजी त्या दोघी घरात एकट्याच असताना हा प्रकार घडला. राजराणी जैन या पलंगावर बसलेल्या असताना संगीताने त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तसेच कपड्यात बांधलेल्या विटेच्या साह्याने त्यांना डोक्यावर जोरदार तडाखे दिले. या घटनेत राजराणी जैन गंभीर जखमी झाल्या आहेत.
सात वर्षांपूर्वी संगीताचा संदीप जैन यांच्याशी विवाह झाला. काही दिवसांपूर्वीच तिने नवऱ्याविरोधात हुंडा व छळवणूकीची तक्रार दाखल केली असून तसेच नवऱ्याकडे घटस्फोटाचीही मागणी केली असून याप्रकरणी न्यायालयात खटला सुरू आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून संगीता माझ्या आई-वडिलांचा छळ करत होती त्यांना मारहाणही करत असे. मी तिच्याविरोधात तक्रारही केली होती, पण माझं कोणीच ऐकलं नाही. अखेर तिला धडा शिकवण्यासाठी आणि तिचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी मी घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावला, असे संदीप यांनी सांगितले.
याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी संगीताला अटक केली असून तिच्याविरोधात कलम ३०७ अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.