शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वर्मा यांची हेरगिरी का? - खरगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 04:02 IST

सीबीआयच्या संचालकपदावरून दूर केलेल्या आलोक वर्मा यांची हेरगिरी का करीत आहात, याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : सीबीआयच्या संचालकपदावरून दूर केलेल्या आलोक वर्मा यांची हेरगिरी का करीत आहात, याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.सीबीआयच्या संचालकांची निवड करणाऱ्या समितीचे खरगे सदस्य आहेत. त्यांनी मोदी यांना लिहिलेल्या वर्मा यांना पदावरून दूर करण्याचे अधिकार ना तुमच्याकडे आहेत ना केंद्रीय दक्षता आयोगाकडे (सीव्हीसी), असे म्हटले आहे. याप्रकरणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, त्या पार्श्वभूमीवर खरगे यांनी मोदी यांच्याकडे उत्तर मागितले आहे.खरगे यांनी पत्रात दिल्ली स्पेशल पोलीस स्थापना कायद्याचा उल्लेख करून मोदी यांना आठवण करून दिली की, सीबीआयच्या संचालकाला ज्या समितीने निवडले, त्याला दूर करण्याचा, त्याची बदली करण्याचा वा सक्तीने रजेवर पाठविण्याचा अधिकार समितीला नाही.आलोक वर्मा यांना मध्यरात्री पदावरून दूर करण्याचा निर्णय मोदी यांनी घेतला. कारण, त्यामुळे वर्मा यांच्या टेबलवर असलेल्या व कारवाईची शक्यता असलेल्या फायली सीबीआयच्या मुख्यालयातून गायब करणे सरकारला शक्य झाले, असेही खरगे म्हणाले. या फायली राफेलशी संबंधित होत्या व प्रशांत भूषण, यशवंत सिन्हा व अरुण शौरी यांच्या अर्जांच्या आधारे बनवल्या होत्या. पंतप्रधान कार्यालय आणि त्याच्याशी संबंधित लोक सीबीआयच्या कामकाजात हस्तक्षेप करीत होते. त्यामुळे हे पाऊल उचलले गेले. मोदी यांच्या पसंतीचे राकेश अस्थाना यांच्यावरील जबरी वसुलीसह अनेक आरोपांची चौकशी करणाºया अधिकाºयांना रात्रीतून दूर केले गेले, अशी टीका त्यांनी केली.>हे का लपवत आहात?खरगे यांनी पत्रात म्हटले आहे की, पंतप्रधान कार्यालय महत्त्वाच्या प्रकरणांची चौकशी दाबून टाकण्याचा प्रयत्न का करीत आहे? विशेषत: राफेल विमान खरेदी घोटाळ्याशी संबंधित गोष्टी का लपवल्या जात आहेत?

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग