पान 2 ‘फोर्स’ आंदोलनाचा फैसला आज - सर्मथक आमदार, मंत्र्यांनी लेखी दिल्यानंतरच होणार निर्णय
By Admin | Updated: August 2, 2015 23:31 IST2015-08-02T23:31:44+5:302015-08-02T23:31:44+5:30
पणजी : इंग्रजी माध्यमाच्या सर्व प्राथमिक शाळांना अनुदानाची मागणी करणार्या ‘फोर्स’ संघटनेचा हे आंदोलन चालूच ठेवावे की नाही याबाबतचा फैसला सोमवारी होणार आहे. 11 सर्मथक आमदार, मंत्र्यांनी हा प्रश्न सोडविण्यासंबंधी लेखी दिल्यानंतरच पालक पुढील निर्णय घेतील. सोमवारी दुपारी 4 वाजता संबंधित शाळांच्या पालक-शिक्षक संघांचे मुख्य पदाधिकारी आझाद मैदानावर जमणार आहेत.

पान 2 ‘फोर्स’ आंदोलनाचा फैसला आज - सर्मथक आमदार, मंत्र्यांनी लेखी दिल्यानंतरच होणार निर्णय
प जी : इंग्रजी माध्यमाच्या सर्व प्राथमिक शाळांना अनुदानाची मागणी करणार्या ‘फोर्स’ संघटनेचा हे आंदोलन चालूच ठेवावे की नाही याबाबतचा फैसला सोमवारी होणार आहे. 11 सर्मथक आमदार, मंत्र्यांनी हा प्रश्न सोडविण्यासंबंधी लेखी दिल्यानंतरच पालक पुढील निर्णय घेतील. सोमवारी दुपारी 4 वाजता संबंधित शाळांच्या पालक-शिक्षक संघांचे मुख्य पदाधिकारी आझाद मैदानावर जमणार आहेत. संघटनेचे सचिव सावियो लोपिस यांनी रविवारी सातव्या दिवशीही उपोषण चालूच ठेवले. त्यांची प्रकृती खालावली आहे. काही पालकही त्यांच्यासोबत साखळी उपोषण करत आहेत. संघटनेच्या खजिनदार सिंथिया फर्नांडिस यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, सर्मथक आमदार, मंत्र्यांकडून प्रश्न धसास लावण्याचे लेखी घेतल्यानंतरच पुढील निर्णय होणार आहे. शुक्रवारी या 10 आमदारांनी आंदोलकांची भेट घेऊन इंग्रजी शाळांना अनुदान देण्याच्या 1 जुलै 2014 च्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाला कायदेशीर स्वरूप देण्याची हमी दिली होती. पुढील विधानसभा अधिवेशनात यासंबंधीचे विधेयक संमत करून घेऊ आणि ते संमत न केल्यास आंदोलनात स्वत: सहभागी होऊ, असे आश्वासन त्यांनी दिले होते. हे आश्वासन आता संघटनेला लेखी स्वरूपात हवे आहे. - आंदोलकांना पाठिंबा देणार्या आमदारांमध्ये मायकल लोबो, नीलेश काब्राल, आवेर्तान फुर्तादो, कालरुस आल्मेदा, बेंजामिन सिल्वा, ग्लेन टिकलो, मंत्री एलिना साल्ढाणा यांचा समावेश होता. शिवाय मंत्री महादेव नाईक, आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर, डॉ. प्रमोद सावंत यांनीही त्यांची भेट घेतली होती. (प्रतिनिधी)