शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अमित शहांवर जहरी टीका; 'तो' शब्द वापरल्याने राहुल गांधींना न्यायालयाने बजावले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 15:20 IST

याप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली असून, पक्षाचे नेते भाजपवर पलटवार करत आहेत.

Rahul Gandhi News: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातीलन्यायालयाने समन्स बजावले आहे. 2018 मध्ये त्यांनी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप आहे. काँग्रेस याला षडयंत्र म्हणत असून, ते या कटात यशस्वी होणार नाहीत, असे काँग्रेसच्या एका नेत्याने म्हटले. 

भाजपचे माजी पदाधिकारी आणि व्यवसायाने वकील विजय मिश्रा यांनी त्यांच्या तक्रारीत राहुल गांधी यांच्या 2018 च्या विधानाबाबत गुन्हा दाखल केला आहे. राहुल गांधी यांनी 2018 मध्ये बंगळुरुमध्ये गृहमंत्री अमित शहा यांना “खूनी” म्हटले होते, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी तक्रार करण्यात आली आहे. राहुल गांधींना किमान दोन वर्षांची शिक्षा व्हावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

यापूर्वी सुरत न्यायालयानेही अशाच एका प्रकरणात राहुल गांधींना 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती आणि त्यानंतर त्यांचे लोकसभा सदस्यत्वही रद्द करण्यात आले होते. मोदी आडनावाशी संबंधित या प्रकरणात राहुलविरोधात ही शिक्षा सुनावण्यात आली होती. नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाने राहुल गांधींना दिलासा मिळाला आणि त्यांचे सदस्यत्वही बहाल करण्यात आले. आता या नव्या प्रकरणावर काँग्रेस आक्रमक झाली आहे.

भाजपचे लोक षडयंत्र रचत आहेत - अशोक गेहलोतकाँग्रेस नेते माणिक टागोर यांनी याप्रकरणी भाजपवर निशाणा साधताना राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे, मात्र आम्ही या झुकणार नाही, असे म्हटले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राहुल गांधींना समन्स पाठवल्याच्या मुद्द्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, भाजपवाले सातत्याने कट रचत आहेत. हे लोक न्यायव्यवस्थेवरही दबाव आणतात. आता त्यांचा हा डाव 2024 मध्ये यशस्वी होणार नाही.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शाहCourtन्यायालयUttar Pradeshउत्तर प्रदेशAshok Gahlotअशोक गहलोतNarendra Modiनरेंद्र मोदी