‘व्हेजिटेरियन मेन्यू प्लीज’, ... पंतप्रधान कार्यालयाचे नवे निर्देश
By Admin | Updated: August 24, 2014 02:30 IST2014-08-24T02:30:40+5:302014-08-24T02:30:40+5:30
‘व्हेजिटेरियन मेन्यू प्लीज’, असा नवा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.
‘व्हेजिटेरियन मेन्यू प्लीज’, ... पंतप्रधान कार्यालयाचे नवे निर्देश
हरीश गुप्ता - नवी दिल्ली
‘व्हेजिटेरियन मेन्यू प्लीज’, असा नवा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. मोदी जेव्हा केव्हा आपल्या 7, रेसकोर्स रोड अथवा हैदराबाद हाऊस येथे शासकीय न्याहारीसह शासकीय मेजवानीचे आयोजन करतील त्यावेळी तेथे मांसाहारी भोजन वाढले जाणार नाही. मग ती विदेशी किंवा देशी पाहुण्यांसाठी भारतात दिलेली मेजवानी असो वा मोदी विदेश दौ:यावर असताना तेथील विदेशी नामवंतांना दिलेली मेजवानी असो, सर्वच ठिकाणी वाढण्यात येणारे भोजन शुद्ध शाकाहारीच असेल.
पंतप्रधान कार्यालयाने परराष्ट्र मंत्रलयासह इतर संबंधित मंत्रलयांना गोपनीय नोट पाठवून शाकाहारी भोजनाला प्रोत्साहन देण्याचे आणि शाकाहारी भोजनच वाढण्याचे निर्देश दिले आहेत. विदेशी दूतावासांनी हैदराबाद हाऊस अथवा दिल्लीत अन्य कोणत्याही ठिकाणी दिलेल्या मेजवानीदरम्यान ‘मद्य’ सादर केले नाही तर उत्तम होईल. पंतप्रधान कार्यालय मांसाहारी भोजनाचा आस्वाद घेण्याच्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा आदर करते. परंतु शासकीय मेजवानीदरम्यान मात्र हा शिष्टाचार पाळला पाहिजे, असे सर्व विभागांना पाठविण्यात आलेल्या या संदेशात स्पष्ट केले आहे.
हल्ली मंत्रलये आणि विभागांमध्ये गुजराती ढोकळा आणि अन्य शाकाहारी भोजन फार लोकप्रिय बनत चालले आहे आणि मंत्रलयांच्या सचिवांमार्फत शासकीय मेजवानीदरम्यान मद्य पुरविण्याचे प्रकार कमीकमी होत आहेत. आता भोजनाचे निमंत्रण थेट मंत्र्यांमार्फत देण्यात येतील तर कॉकटेल पार्टीचे निमंत्रण मंत्रलयांच्या सचिवांमार्फत स्वतंत्रपणो दिले जाईल. केवळ शाकाहारी भोजनच वाढण्याचे स्पष्ट निर्देश मंत्र्यांना देण्यात आले आहेत.
4केवळ भारतीय संस्कृतीचा प्रचार करणो हाच सरकारच्या या कृतीमागचा उद्देश नसून बिगर योजना खर्च कमी करणो हादेखील यामागचा एक हेतू आहे.
4पंतप्रधान मोदी हे 31 ऑगस्टला जपानच्या दौ:यावर जाणार आहेत आणि त्यांनी अल्कोहोल (व्हिस्की आणि मद्य आदी) उपलब्ध करून न देण्याचे स्पष्ट निर्देश एअर इंडियाला दिले आहेत.