शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वसुंधरा राजेंच्या ताफ्यावर दगडफेक, भाजपानं काँग्रेसवर केला हल्ल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 15:29 IST

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या ताफ्यावर काही आंदोलकांनी दगडफेक केली आहे. या हल्ल्यात वसुंधरा राजे थोडक्यात बचावल्या आहेत.

जोधपूर- राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या ताफ्यावर काही आंदोलकांनी दगडफेक केली आहे. या हल्ल्यात वसुंधरा राजे थोडक्यात बचावल्या आहेत. वसुंधरा राजे जोधपूर जिल्ह्यातून जात असताना हा हल्ला करण्यात आला असून, हल्ल्याला काँग्रेसचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचा आरोप भाजपानं केला आहे. वसुंधरा राजेंनी राज्यभरात गौरव यात्रा काढली आहे. या हल्ल्यानंतर वसुंधरा राजेंनी नियोजित कार्यक्रम रद्द केले असून, त्या विशेष विमानानं जोधपूरहून जयपूरमध्ये दाखल झाल्या आहेत. तसेच अशा भ्याड हल्ल्यांना मी घाबरत नसल्याचंही वसुंधरा राजेंनी काँग्रेसला ठणकावून सांगितलं आहे.राजे म्हणाल्या, दगडफेक करण्याचा हा प्रकार काँग्रेस नेत्याच्या आदेशावरून झाला आहे. त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की, मी अशा हल्ल्यांना घाबरत नाही. मी राजस्थानसाठी स्वतःचा जीवही देण्यास तयार आहे. दगडफेक करून त्या लोकांनी स्वतःची हतबलता दाखवून दिली आहे. काँग्रेसनं विकासाचं कोणतंही कार्य केलेलं नाही. आम्ही पुन्हा राजस्थानमध्ये सत्ता हस्तगत करू, असा विश्वासही वसुंधरा राजेंनी व्यक्त केला आहे. ज्या आंदोलकांनी दगडफेक केली ते माजी मुख्यमंत्र्यांचं नाव घेत होते. त्यामुळे तो नेता अशोक गेहलोत असल्याचीही चर्चाही आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.काल रात्री 9.15 वाजता एका सभेला संबोधित करत वसुंधरा राजेंच्या बसवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांचा पाठलाग केला, परंतु ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलिसांना दगडफेक करणा-या आंदोलकांचे फुटेज मिळाले असून, लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.  राजस्थान काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार हिरालाल बिश्नोई यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. लोक भाजपावर नाराज आहेत, परंतु ही नाराजी दाखवण्यासाठी हिंसेचा मार्ग अवलंबू नये, असंही हिरालाल बिश्नोई म्हणाले आहेत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानBJPभाजपा