वरूण गांधी यांनाही ग्रासले चिकनगुनियाने

By Admin | Updated: October 1, 2016 01:53 IST2016-10-01T01:53:48+5:302016-10-01T01:53:48+5:30

चिकनगुनियाने दिल्लीत व उत्तरेत थैमान घातले असता भाजपचे खासदार वरुण गांधी यांनाही त्याचा झटका बसला. केरळमधील कोझिकोडे येथील राष्ट्रीय परिषदेला ते उपस्थित नव्हते.

Varun Gandhi also grilled Chikungunya | वरूण गांधी यांनाही ग्रासले चिकनगुनियाने

वरूण गांधी यांनाही ग्रासले चिकनगुनियाने

- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
चिकनगुनियाने दिल्लीत व उत्तरेत थैमान घातले असता भाजपचे खासदार वरुण गांधी यांनाही त्याचा झटका बसला. केरळमधील कोझिकोडे येथील राष्ट्रीय परिषदेला ते उपस्थित नव्हते. ही बातमी समजल्यावर थेट वरुण यांच्याशी संपर्क साधला असता, आपण चिकनगुनियाने आजारी असून आता प्रकृती बरी असल्याचे सांगितले.
युपी दौऱ्यानंतर वरुण गांधींना चिकनगुनियाने ग्रासले. ते दिल्लीच्या जोरबाग येथील निवासस्थानी विश्रांती घेत होते. त्यावेळी भाजपच्या एका महत्त्वाच्या नेत्याने कोझिकोडे येथील पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीला आपण येणार की नाही? याची चौकशी करण्यासाठी वरूण गांधींशी संपर्क साधला. तेव्हा चिकनगुनियाने आजारी असल्यामुळे बैठकीला येता येणे शक्य नाही, असे उत्तर वरुण गांधींनी त्यांना दिले.

Web Title: Varun Gandhi also grilled Chikungunya