भीम महोत्सवाअतंर्गत विविध कार्यक्रम पत्रपरिषद : एक लाख बहुजनांचा महामेळावा
By Admin | Updated: February 5, 2016 00:34 IST2016-02-05T00:34:10+5:302016-02-05T00:34:10+5:30
जळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती तसेच राष्ट्रमाता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध कार्यक्रम होणार असून ७ फेब्रुवारी एक लाख बहुजनांचा महामेळावा होणार आहे.

भीम महोत्सवाअतंर्गत विविध कार्यक्रम पत्रपरिषद : एक लाख बहुजनांचा महामेळावा
ज गाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती तसेच राष्ट्रमाता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध कार्यक्रम होणार असून ७ फेब्रुवारी एक लाख बहुजनांचा महामेळावा होणार आहे. या संदर्भात गुरुवारी संध्याकाळी पत्रपरिषद होऊन त्यात ही माहिती देण्यात आली. या वेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश महामंत्री जगन सोनवणे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजू मोरे, महानगराध्यक्ष नारायण सपकाळे, बी.के. बनसोडे, महेंद्र सपकाळे, इरफान शेख, मिलिंद सोनवणे, कल्पेश मोरे, सिद्धांत मोरे, भिमराव सपकाळे आदी उपस्थित होते. या वेळी माहिती देताना जगन सोनवणे व राजू मोरे यांनी सांगितले की, ७ फेब्रुवारी रोजी प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहे. यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या २५ शाखांचे उद्घाटन, भिमालय या दोन जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन, राजू बागूल यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम, पंचशील आर्केस्टा इत्यादी कार्यक्रम होणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये प्रा. जोगेंद्र कवाडे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या महोत्सवांतर्गत ६ रोजी संध्याकाळी शिवतीर्थ मैदानावर दीक्षाभूमीची प्रतिकृती उभारण्यात येणार असून ७ रोजी ती दर्शनार्थ खुली केली जाणार आहे. तसेच याच दिवशी भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचेही दर्शन करता येणार आहे. रोहीत वेमुला याच्या मृत्यूप्रकरणी रात्री १० वाजता निषेध मेणबत्ती महामोर्चा काढण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पत्रपरिषदेत करण्यात आले.