रोहणखेड येथे शुक्रवारी वर्हाडी कविसंमेलन
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:11+5:302015-02-14T23:51:11+5:30
रोहणखेड : आकोट तालुक्यातील रोहणखेड येथे विठ्ठल मंदिरात २० फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता शिवजयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड रोहणखेड शाखेच्यावतीने वर्हाडी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच समाज प्रबोधनपर कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आला आहे.

रोहणखेड येथे शुक्रवारी वर्हाडी कविसंमेलन
र हणखेड : आकोट तालुक्यातील रोहणखेड येथे विठ्ठल मंदिरात २० फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता शिवजयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड रोहणखेड शाखेच्यावतीने वर्हाडी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच समाज प्रबोधनपर कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आला आहे. या कविसंमेलनात कवी हिंमत ढाळे, संतोष कोकाटे, सुरेश लांडे, सिद्धार्थ तायडे सहभागी होतील. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोहणखेड सरपंच रंजित झामरे राहतील. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंकज जायले, माजी जि. प. सदस्य शिवाजीराव देशमुख, जि. प. कृषी सभापती रामदास माळवे, माजी सभापती विजय सोळंके, दहिहांडा ठाणेदार ताराचंद किल्लेवाले, तायडे, अंबादास उगले, जिल्हा प्रवक्ते कपिल ढोके यांची प्रमुख उपस्थिती राहील. कार्यक्रमाचे आयोजन कुटासा सर्कलप्रमुख अमोल काळणे, मिलिंद झामरे, प्रफुल्ल शेळके, कुटासा ब्रिगेड सर्कलशाखा प्रवक्ता वैभव झामरे, शाखा कार्याध्यक्ष विठ्ठल झामरे यांनी केले आहे. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमोल काळणे, नंदू दाने, अशोक झामरे, देवानंद आग्रे, बबन झामरे, नीळकंठ झामरे, पोलीस पाटील सुनील झामरे, रंजित झामरे, नीलेश झामरे आदी परिश्रम घेत आहेत. (वार्ताहर)........