शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"जितकी देणगी, तितका सन्मान मिळेल", काशी विश्वनाथ मंदिर प्रशासनाकडून नवीन नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 19:53 IST

Kashi Vishwanath Temple : श्री काशी विश्वनाथ मंदिर विश्वस्त परिषद प्रसाद बनवण्याची नवी व्यवस्था करणार आहे.

वाराणसी : वाराणसीतील श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्ट कौन्सिलने देणगीदारांचा सन्मान करण्यासाठी नियमावली तयार केली आहे. दरम्यान, देणगीदारांचा सन्मान करण्याची जुनी परंपरा आहे. ५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत देणगी देणाऱ्या दात्यांना मंदिर प्रशासनाकडून धन्यवाद पत्रक, प्रसाद, रुद्राक्ष हार आणि भस्म देण्यात येईल. १ लाख ते १० लाख रुपयांची देणगी देणाऱ्यांना मंदिर प्रशासनाकडून धन्यवाद पत्रक, प्रसाद, रुद्राक्ष हार आणि भस्म देण्यात येणार आहे. याशिवाय, मंदिर प्रशासन वर्षातून एकदा त्यांच्यासाठी विशेष पूजेची व्यवस्था करेल, असे नियमावलीत ठरवण्यात आले आहे.

याचबरोबर, ११ लाख आणि त्याहून अधिक रकमेच्या देणगीदारांना मंदिर प्रशासनाकडून धन्यवाद पत्रक, प्रसाद, रुद्राक्ष हार आणि भस्म दिले जाईल. तसेच १० वर्षांपासून मंदिर प्रशासन वर्षातून एकदा मोफत विशेष पूजा करण्याची व्यवस्था केली जाईल. मंदिर प्रशासनाचे सीईओ विश्व भूषण मिश्रा यांनी एका वृत्त वाहिनीशी खास संवाद साधताना सांगितले की, देणगीदारांचे आभार मानण्याचा हा एक प्रकार आहे. याशिवाय, देणगीचे सकारात्मक पद्धतीने वर्णन करण्याचा हा एक मार्ग आहे. याला व्हीव्हीआयपी म्हणणे योग्य नाही, कारण देणगीदार हे व्हीव्हीआयपी नसून शिवभक्त आहेत आणि श्री काशी विश्वनाथाच्या दरबारात भक्त आणि भक्त यात फरक असू शकत नाही. मंदिर प्रशासन दान केलेल्या पैशातून गौशाळा, विद्यालय आणि रुग्णांसाठी भोजनाची व्यवस्था करते.

प्रसाद बनवण्याची नवी व्यवस्थाश्री काशी विश्वनाथ मंदिर विश्वस्त परिषद प्रसाद बनवण्याची नवी व्यवस्था करणार आहे. मंदिर प्रशासनाचे सीईओ विश्व भूषण मिश्रा म्हणाले की, एक केंद्रीय प्रसाद उत्पादन व्यवस्था असेल, ज्यामध्ये फक्त एक एजन्सी शुद्ध, सात्विक आणि पवित्र वातावरणात प्रसाद तयार करेल. सध्या विक्रेत्यांमार्फत प्रसाद बनवण्याच्या निविदा काढल्या जातात आणि त्याची नियमित तपासणी केली जाते, मात्र लवकरच प्रसाद बनवण्याची नवी व्यवस्था तयार केली जाणार आहे. प्रसाद बनवणाऱ्यांना स्नान, ध्यान आणि बाबा विश्वनाथ यांची पूजा केल्यानंतरच प्रसाद बनवण्याची परवानगी असणार आहे. मंदिर प्रशासनाकडून प्रसादाच्या तयारीवर सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे, असे मंदिर प्रशासनाचे सीईओ विश्व भूषण मिश्रा यांनी सांगितले.

टॅग्स :VaranasiवाराणसीTempleमंदिर