शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नव्या बॉयफ्रेंन्डसाठी जुन्या प्रियकराची हत्या; चालत्या बाईकवरुन तरुणावर झाडली गोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 14:32 IST

वाराणसीमध्ये एका तरुणीने नवीन प्रियकरासाठी पूर्वीच्या प्रियकराची हत्या घडवून आणली.

Varanasi Crime: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एका महिलेने प्रियकरासाठी पतीची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकरण देशभरात गाजत आहेत. पतीच्या मृतदेहाचे तुकडे करुन ड्रममध्ये भरल्याचा प्रकार समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशात खळबळ उडाली. त्यानंतर आता वाराणसीमधूनही हादरवणारी घटना घडली आहे. एका मुलीने तिच्या जुन्या प्रियकराची तिच्या नवीन प्रियकराकडून हत्या घडवून आणली आहे. होळीच्या रात्री हा सगळा प्रकार घडला. आता पोलिसांनी या खुनाचा खुलासा करत आरोपीला अटक केली आहे.

वाराणसीच्या औसनगंजमध्ये दिलजीत उर्फ ​​रंगोली नावाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येनंतर आरोपी फरार झाले होते. या घटनेनंतर बराच तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. हा सगळा प्रकार घडला तेव्हा दिलजीत त्याच्या घराबाहेर प्रेयसीसोबत फोनवर बोलत होता. त्याचवेळी अचानक हेल्मेट घातलेला एक तरुण बाईकवरुन दिलजीतजवळ आला. त्याने फिल्मी स्टाईलमध्ये चालत्या बाईकवरून दिलजीतच्या छातीत गोळी झाडली आणि तेथून पळ काढला. आजूबाजूच्या लोकांनी दिलजीतला तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

मृत दिलजीतचे काही महिन्यांपूर्वीच साखरपुडा झाला होता. मात्र तो त्याच्या जुन्या प्रेयसीला सोडू शकला नाही. मात्र त्या तरुणीला दिलजीतपासून सुटका हवी होती. त्यामुळे तरुणीने मुघलसराय येथील नवीन प्रियकर राजकुमार याची मदत घेतली. महत्त्वाची बाब म्हणजे दिलजीतनेच राजकुमारची त्याच्या प्रेयसीसोबत ओळख करून दिली होती आणि तिघेही एकमेकांना चांगले ओळखत होते. राजकुमारमुळेच तरुणीने दिलजीतसोबत संबंध तोडले. मात्र दिलजीत तरुणीला सोडण्यासाठी तयार नव्हता. शेवटी राजकुमार आणि तरुणीने मिळून दिलजीतला बाजूला करण्याचा कट रचला.

व्हिडिओ चॅटच्या माध्यमातून राजकुमारने तरुणीला त्याच्याकडेची बंदूक दाखवली होती. यावरुनच तरुणीने दिलजीतला संपवण्याची योजना होती. तरुणीने आणि राजकुरमाने होळीच्या दिवशी दिलजीतला संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तरुणीने दिलजीतल फोनवर बोलता बोलता घराबाहेर बोलवलं.  त्यानंतर दिलजीतच्या छातीत गोळी झाडली. या सगळ्या प्रकारानंतर ५० मिनिटांनी आरोपी राजकुमार एका टेम्पोच्या मागे उभ्या असलेल्या दुचाकीवर बॅगसह दिसला. नंतर तो घटनास्थळावरून पळून गेला.

दरम्यान, संशयाच्या आधारे पोलिसांनी प्रेयसीची चौकशी करुन आरोपीला पकडले. जैतपुरा पोलिसांच्या पथकाने सकाळी आरोपीला वाराणसीच्या संपूर्णानंद विद्यापीठाच्या गेटजवळ अटक केली. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी