वैदिक यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल
By Admin | Updated: July 16, 2014 18:02 IST2014-07-16T18:02:24+5:302014-07-16T18:02:24+5:30
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याची भेट घेणारे ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैदिक यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल
ऑनलाइन टीम
इंदोर, दि. १६ - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याची भेट घेणारे ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैदिक यांच्याविरोधात इंदोर आणि वाराणसीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून याची सुनावणी येत्या २५ जुलैपर्यंत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वैदिक यांनी हाफिज सईद याची भेट घेतल्यापासून देशभर त्यांच्याविरोधात चौफेर हल्ला चढविला जात आहे. काही हिंदुत्ववादी संघटनेच्या नेत्यांनी वैदिक यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केलेला असतानाच महाराष्ट्रात मात्र, शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षाने त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली पाकमध्ये जाऊन दहशतवाद्यांच्या म्होरक्याला भेटणा-यांना चटके द्यायला पाहिजे असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. वैदिक यांच्याविरोधात काँग्रेसही आक्रमक झाली असून त्यांच्याविरोधात देशभरात ठिकठिकाणी आंदोलने चालवली आहेत.