वंदे मातरम म्हणणारच
By Admin | Updated: March 21, 2016 00:21 IST2016-03-21T00:21:43+5:302016-03-21T00:21:43+5:30
- हुसेन दलवाई : एमआयएम आमदाराच्या कारवाईस पाठिंबा चुकीचा

वंदे मातरम म्हणणारच
ज गाव : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या जळगाव शाखेची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी सायंकाळी ७ वाजता पार पडली. या बैठकीत शहर शाखेची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्यात समितीच्या कार्याध्यक्षपदी हेमंत सोनवणे यांची तर सचिवपदी गिरीश चौधरी यांची निवड झाली.या बैठकीत निरीक्षक ॲड.भरत गुजर (जिल्हा पदाधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. बैठकीला जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस. कट्यारे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीला १५ दिवसांपासून सुरू सभासद नोंदणीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर कार्यकारिणी जाहीर झाली. नवी कार्यकारिणी अशी- अध्यक्ष प्रा.विनोद निताळे, उपाध्यक्ष वैशाली चौधरी, कायदे सल्लागार ॲड.एस.एस. पाटील, प्रकल्प प्रमुख आर.एस. चौधरी, विविध उपक्रम विभाग रवीशंकर भराड, बुवाबाजी संघर्ष विभाग ॲड.डी.एच. भालेराव, सदस्य विश्वजीत चौधरी, मुकुंदा सपकाळे, ॲड.मंजुळा मुंदडा, संदीप कुमावत, सुनील पवार, विजय लुल्हे, अशफाक पिंजारी, आर.बी. पाटील यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.