वंदे मातरम न बोलणा-यांनी भारतात राहू नये - साध्वी प्राची

By Admin | Updated: March 18, 2015 10:55 IST2015-03-18T10:51:52+5:302015-03-18T10:55:24+5:30

भारत माता की जय व वंदे मातरम बोलण्यास नकार देणा-यांना भारतात राहण्याचा हक्क नाही असे वादग्रस्त विधान विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी केले आहे.

Vande Mataram should not stay in India - Sadhvi Prachi | वंदे मातरम न बोलणा-यांनी भारतात राहू नये - साध्वी प्राची

वंदे मातरम न बोलणा-यांनी भारतात राहू नये - साध्वी प्राची

>ऑनलाइन लोकमत 
लखनौ, दि. १९ - भारत माता की जय व वंदे मातरम बोलण्यास नकार देणा-यांना भारतात राहण्याचा हक्क नाही असे वादग्रस्त विधान विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी केले आहे. भारताला महात्मा गांधीजींमुळे नाही तर भगत सिंग व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळेच स्वातंत्र्य मिळू शकले असेही त्यांनी म्हटले आहे. 
उत्तरप्रदेशमध्ये पार पडलेल्या हिंदू संमेलनात साध्वी प्राची यांनी वादग्रस्त विधांनाची मालिका सुरुच ठेवली. भारत माता की जय, वंदे मातरम न म्हणणारी मंडळी व गोवंशा हत्या करणा-यांना भारतात राहण्याचा हक्क नाही असे प्राची यांनी सांगितले. दोन पेक्षा अधिक मुलं असलेल्यांना हिंदू किंवा मुस्लीम दाम्पत्त्यांना मतदान करण्यापासून रोखले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

Web Title: Vande Mataram should not stay in India - Sadhvi Prachi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.