शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

Vande Bharat Train Accident:अजब कायदा; 'वंदे भारत ट्रेन'ला म्हशी धडकल्या, रेल्वेने मालकांविरोधात दाखल केला गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 14:44 IST

Vande Bharat Train Accident:गुरुवारी मुंबईवरुन अहमदाबादला जणाऱ्या वंदे भारत ट्रेनला म्हशी धडकल्यामुळे मोठा अपघात झाल्याची घटना.

Vande Bharat Train Accident: 30 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील तिसऱ्या 'वंदे भारत ट्रेन'ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. त्याच्या काही दिवसानंतर म्हणजेच, गुरुवारी(दि.6) मुंबईहून अहमदाबादकडे जाणाऱ्या या हायस्पीड वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Train)चा अपघात झाला. रेल्वे रुळावरून घसरली नाही, तर काही म्हशी ट्रेनला धडकल्या. वाटवा आणि मणिनगर स्थानकांजवळ हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, रेल्वेचा पुढील भाग तुटला. तसेच, या अपघातात 4 म्हशींचा मृत्यूही झाला. 

म्हशींच्या मालकांविरोधात गुन्हाया अपघातानंतर रेल्वे विभागाने एक अजब काम केले आहे. म्हशींच्या मृत्यूमुळे मोठे नुकसान झालेल्या मालकांविरोधात रेल्वे संरक्षण दलाने (RPF) गुन्हा दाखल केला आहे. वाटवा रेल्वे स्टेशनवर तैनात आरपीएफ निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी सांगितले की, म्हशींच्या मालकांविरोधात रेल्वे कायदा, 1989 च्या कलम 147 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. रेल्वेच्या कोणत्याही भागात अनधिकृतपणे प्रवेश करणे आणि त्याच्या मालमत्तेच्या गैरवापराशी संबंधित हा कायदा आहे. अद्याप म्हशींच्या मालकांची ओळख पटलेली नाही.

ट्रेन 20 मिनिटे थांबवावी लागलीअहमदाबाद रेल्वेच्या पीआरओने सांगितले की, सकाळी 11.15 च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रेन 20 मिनिटे थांबवावी लागली. त्यानंतर गाडी रवाना करण्यात आली. रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकूर म्हणाले की, गावकऱ्यांना त्यांची गुरे ट्रॅकजवळ न सोडण्याचा सल्ला देण्यात येत आहे. पश्चिम रेल्वे गांधीनगर-अहमदाबाद सेक्शनवर ट्रेनचा वेग ताशी 160 किमीपर्यंत वाढविण्याचे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कुंपण घालण्याचे काम करेल.

भारतातील तिसरी वंदे भारत ट्रेनदेशातील ही तिसरी वंदे भारत ट्रेन आहे. यापूर्वी वंदे भारत ट्रेन नवी दिल्ली ते वाराणसी आणि नवी दिल्ली-माता वैष्णो देवी कटरा दरम्यान धावत आहेत. ही गाडी गांधीनगरहून अहमदाबादमार्गे मुंबईला जाते आणि नंतर या मार्गाने पुन्हा गांधीनगरला येते. विशेष म्हणजे या 'वंदे भारत ट्रेन'ला 30 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवला होता. त्यांनी गांधीनगर ते अहमदाबाद असा प्रवासही केला. ही ट्रेन 180 ते 200 किमी/ताशी वेगाने धावू शकते.

आणखी 400 वंदे भारत ट्रेन चालवण्याची तयारीरेल्वे बोर्ड देशभरात 400 सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन चालवण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारने मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी येथे वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे सुमारे 1600 डबे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रत्येक डब्याची किंमत 8 कोटी ते 9 कोटी रुपये असेल. त्यामुळे कारखान्यात आवश्यक बदल सुरू झाले आहेत. वंदे भारत ट्रेन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. यामध्ये जीपीएस आधारित माहिती प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, व्हॅक्यूम आधारित बायो टॉयलेट, स्वयंचलित दरवाजे आणि प्रत्येक कोचमध्ये चार आपत्कालीन पुश बटणे यांचा समावेश आहे. 

टॅग्स :AccidentअपघातIndian Railwayभारतीय रेल्वेNarendra Modiनरेंद्र मोदी