काणकोण येथे वनमहोत्सव
By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:17+5:302015-08-27T23:45:17+5:30
काणकोण : काणकोण सारस्वत समाजाच्या युवा विभागातर्फे कुलटी येथे वनमहोत्सव साजरा करण्यात आला. संस्थेचे खजिनदार ज्ञानानंद प्रभूगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या वनमहोत्सवास भूषण प्रभूगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते झाड लावून वनमहोत्सवाची सुरुवात झाली. यावेळी युवा अध्यक्ष अनिल कामत, प्रमोद कामत, शिरीष पै व लक्ष्मीधर भट उपस्थित होते.

काणकोण येथे वनमहोत्सव
क णकोण : काणकोण सारस्वत समाजाच्या युवा विभागातर्फे कुलटी येथे वनमहोत्सव साजरा करण्यात आला. संस्थेचे खजिनदार ज्ञानानंद प्रभूगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या वनमहोत्सवास भूषण प्रभूगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते झाड लावून वनमहोत्सवाची सुरुवात झाली. यावेळी युवा अध्यक्ष अनिल कामत, प्रमोद कामत, शिरीष पै व लक्ष्मीधर भट उपस्थित होते.या वनमहोत्सवात कुलटी येथील वीज सब स्टेशनमागे वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली. विजयकुमार प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली युवा विभागाच्या सदस्यांनी हे वृक्षारोपण केले. जंगली झाडांबरोबरच आवळा, कोकम यासारख्या झाडाबरोबरच चिकू व आंब्याचीही कलमे यावेळी लावण्यात आली. त्याचबरोबर माळेवाडे येथील ‘आरव’ या देवाच्या जागेची साफसफाई करण्यात आली. ही स्वच्छता मोहीम प्रभूगावकर, दुर्गेश प्रभु व रामानंद प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. (प्रतिनिधी)