लालूंवर फॅन कोसळला, थोडक्यात बचावले
By Admin | Updated: October 16, 2015 18:19 IST2015-10-16T18:13:21+5:302015-10-16T18:19:48+5:30
येथील बिहार विधानसभा निवडणूकीच्या रॅलीदरम्यान राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर सिलिंग फॅन कोसळला. मात्र यात ते थोडक्यात बचावले.

लालूंवर फॅन कोसळला, थोडक्यात बचावले
ऑनलाइन लोकमत
मोतीहारी, दि. १६ - येथील बिहार विधानसभा निवडणूकीच्या रॅलीदरम्यान राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर सिलिंग फॅन कोसळला. मात्र यात ते थोडक्यात बचावले.
सध्या बिहार विधानसभा निवडणूकीला चांगलाच रंग चढत आहे. सर्वच राजकीय नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी जोर धरला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनीही मोतीहारी येथे रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी भाषण करण्यासाठी लालू प्रसाद यादव मंचावर बसले असता, मंच्यावर व्यवस्थित न बसविलेला सिलिंग फॅन अचानक त्यांच्याजवळ कोसळला. मात्र, यात ते थोडक्यात बचावले.
दरम्यान, असा प्रसंग लालू प्रसाद यादव यांच्यावर दुस-यांदा आला आहे. या आधीही बिहारच्या अरवल जिल्ह्यातील मधुबन मैदानावरील सभेदरम्यान लाकडाच्या मंचावर क्षमतेपेक्षा अधिक लोक बसल्याने तो कोसळला. यावेळीही लालू यादव यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मंच कोसळल्यामुळे सभास्थळी गडबड- गोंधळ उडाला होता.