‘व्हॅलेंटाइन डे’ला छळ झालेल्या तरुणाची आत्महत्या
By Admin | Updated: February 25, 2017 00:31 IST2017-02-25T00:31:40+5:302017-02-25T00:31:40+5:30
‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी नीतिमत्तेच्या तथाकथित रक्षकांकडून छळ झालेल्या तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले. केरळच्या पल्लकड जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली.

‘व्हॅलेंटाइन डे’ला छळ झालेल्या तरुणाची आत्महत्या
पलक्कड : ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी नीतिमत्तेच्या तथाकथित रक्षकांकडून छळ झालेल्या तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले. केरळच्या पल्लकड जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली. अनिश (२२) असे या युवकाचे नाव आहे. १४ फेब्रुवारी रोजी स्वत:ला नीतिमत्तेचे रक्षक म्हणवणाऱ्यांनी अनिश आणि त्याच्या मैत्रिणीचा छळ करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता. हे जिव्हारी लागल्यामुळे अनिशने टोकाचे पाऊल उचलले. गुरुवारी सायंकाळी अनिश त्याच्या घरामागील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला, असे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. ही घटना जिल्ह्यातील अट्टापडी येथे घडली. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून, त्यात अनिशने आपल्या मृत्यूला दोन लोक जबाबदार असल्याचे म्हटले आहे. चिठ्ठीत नावे असलेल्या दोघांविरुद्ध पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला आहे.