व्हॅलेन्टाईन डे विरोध भाग २
By Admin | Updated: February 13, 2015 23:10 IST2015-02-13T23:10:51+5:302015-02-13T23:10:51+5:30

व्हॅलेन्टाईन डे विरोध भाग २
>चौकटआपला तो बाब्या..दुसऱ्याचं ते कार्टअंबाझरी उद्यानात कार्यकर्त्यांनी धावत जाऊन एका जोडप्याला घेरले अन् अरेरावी सुरू केली. जोडप्यातील मुलगा एका कार्यकर्त्याचा जवळचा परिचित निघाला अन् त्यांना अभय मिळाले. लागलीच सर्वांनी दुसऱ्या जोडप्याकडे मोर्चा वळवला. संस्कृतीरक्षणाचा विरोध हा परिचितांसाठी नव्हता का असा प्रश्न यावेळी एका जेष्ठ नागरिकाने काही वेळानंतर उपस्थित केला.पोलिसांच्या डोळ्यावर पट्टीभरदिवसा डोळ्यादेखत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत होते. एकेका चारचाकी गाडीत १४ जण, मोटरसायकलवर तिघेजण असतानादेखील वाहतुक पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. विशेष म्हणजे महिला सुरक्षेचा दावा पोलिस विभागातर्फे करण्यात येतो. परंतु सर्वांदेखत तरुणींशी आक्षेपार्ह भाषेत अरेरावी करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई करण्याचे धाडस अंबाझरी परिसरात पोलिसांनी दाखविले नाही. यांना अधिकार दिला कुणी?फुटाळा परिसरातील काही तरुणींना या गोंधळाबाबत संताप व्यक्त केला. ज्या संस्कृतीचे गोडवे हे संस्कृतीरक्षक गातात, त्यात प्रेमाची उदाहरणे नाहीत काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भारतीय संविधानाने सार्वजनिक ठिकाणी कुठेही फिरण्याचा अधिकार दिला आहे. आम्ही कुठलेही अश्लाघ्य वर्तन करत नव्हतो. मग आमच्याशी या भाषेत बोलण्याचा अन् आम्हाला येथून हाकलण्याचा यांना अधिकार दिला तरी कोणी अशी प्रतिक्रिया तरुणींनी व्यक्त केली.