व्हॅलेन्टाईन डे ॲड असिम व रमा सरोदे

By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:16+5:302015-02-13T23:11:16+5:30

पुणे : सुरूवातीला वर्गमित्र...मग बेस्ट फ्रेडस आणि त्यानंतर आयुष्याचे जोडीदार...लोकांच्या खटल्यांमध्ये युक्तिवाद करता करता त्यांनी कधी स्वत:च्या आयुष्यचा खटला एकमेकांपुढे हरला याचे मुळ त्यांना आज १६ वर्षानंतरही गवसलेला नाही मात्र १६ वर्षापूर्वी जुळलेला प्रेमाचा धागा आता अधिक परिपक्व झाला आहे. एकाच व्यवसायात असूनही एकमेकांची स्पेस जपत आपपली ओळख निर्माण करणारे ॲड असिम व ॲड रमा सरोदे हे असेच आगळे वेगळे दाम्पत्य.

Valentine's Day Asim and Rama Sarode | व्हॅलेन्टाईन डे ॲड असिम व रमा सरोदे

व्हॅलेन्टाईन डे ॲड असिम व रमा सरोदे

णे : सुरूवातीला वर्गमित्र...मग बेस्ट फ्रेडस आणि त्यानंतर आयुष्याचे जोडीदार...लोकांच्या खटल्यांमध्ये युक्तिवाद करता करता त्यांनी कधी स्वत:च्या आयुष्यचा खटला एकमेकांपुढे हरला याचे मुळ त्यांना आज १६ वर्षानंतरही गवसलेला नाही मात्र १६ वर्षापूर्वी जुळलेला प्रेमाचा धागा आता अधिक परिपक्व झाला आहे. एकाच व्यवसायात असूनही एकमेकांची स्पेस जपत आपपली ओळख निर्माण करणारे ॲड असिम व ॲड रमा सरोदे हे असेच आगळे वेगळे दाम्पत्य.
आयएलएस लॉ कॉलेजमध्ये असिम व रमा यांच्या प्रेमाची मुहुर्तमेढ झाली. ते दोघेही एकाच वर्गात होते त्यामुळे साहजिकच एकमेकांना समजून घेण्याचा, सहवासाचा काळ त्यांना मिळाला होता. याबाबत ॲड असिम सांगतात, आमचा काही मित्र मैत्रिणींचा ग्रुप होता. त्यात रमा अभ्यासात हुशार होती. तिचे आकलन चांगले होते. त्यामुळे तास संपल्यानंतर आमच्या शंका, अडचणी ती आम्हाला विश्लेषण करून सांगत असे. तिचा स्वभाव अतिशय लाघवी होता. ती कोणावरच चिडायची नाही याउलट खूपजणांची ती चांगली मैत्रिण होती. तिचा हा स्वभाव मला नेहमीच आवडत होता. आपल्या उणीवा भरून काढणारी अशीच सहचरणी आपल्यालाही लाभावी असे मलाही वाटत होते. खरेतर तसे रमाविषयीच वाटत होते. मुळात आम्ही दोघे कायमचा अभ्यासाच्या, वादविवाद स्पर्धेच्या, म्युट कोर्टाच्या तयारीच्या निमित्ताने सतत एकत्र असायचो. त्यामुळे आमचे बंध कधी जुळले हे नेमके आम्हालाही सांगणे कठीण. आमच्या गु्रपमधील मित्रांना मात्र याची जाणीव खूप आधी झाली होती. तिच्याविषयी एक गंमत सांगायला आवडेल. व्हॅलेन्टाईन दिनाच्या आधी कॉलेजमध्ये वेगवेगळे डेज साजरे केले जातात. आमच्यावेळी कोणत्या मुलीला किती चॉकलेटस किंवा गुलाब मिळतात अशी एक अलिखित स्पर्धा व्हायची. त्यामुळे मुलेही भरभरून मुलींना असे गिफ्टस द्यायचे. मीसुद्धा द्यायचो. रमाविषयी असणार्‍या सुप्त भावनेतूनच खरेतर मी तिला गुलाब देऊ केले होते मात्र ती मुळातच अशा स्पर्धांच्या बाहेर होती. आपल्याला किती गुलाब मिळाले याविषयी ती फार काही गंभीर नव्हती अगदी मी दिलेले गुलाबही तिने तसेच स्वीकारलेले होते.
या गंमतीदार आठवणीच्या पुढे जाऊन असिम व रमा सांगतात की, खरेतर कोणी कोणाला प्रपोज केलेच नाही. कारण तशी वेळच आली नाही इतके आम्ही एकमेकांसोबत होतो त्यामुळे कुटुंबियांनीच समजून घेतले आणि आमचा विवाह झाला.

Web Title: Valentine's Day Asim and Rama Sarode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.