कोठारी ज्वेलर्समध्ये व्हॅलेन्टाईन स्पेशल कलेक्शन

By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:05+5:302015-02-13T23:11:05+5:30

कोठारी ज्वेलर्समध्ये व्हॅलेन्टाईन स्पेशल कलेक्शन

Valentine Special Collections at Kothari Jewelers | कोठारी ज्वेलर्समध्ये व्हॅलेन्टाईन स्पेशल कलेक्शन

कोठारी ज्वेलर्समध्ये व्हॅलेन्टाईन स्पेशल कलेक्शन

ठारी ज्वेलर्समध्ये व्हॅलेन्टाईन स्पेशल कलेक्शन
नागपूर : सुप्रसिद्ध करण कोठारी ज्वेलर्समध्ये व्हॅलेन्टाईन डे निमित्त आकर्षक डिझाईनची गोल्ड आणि डायमंड ज्वेलरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यानिमित्त डायमंडच्या लाईट ज्वेलरीची विशेष मागणी होत आहे. शोरूममध्ये डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी कलेक्शन ठेवण्यात आले आहे. करण कोठारी ज्वेलर्सने नेहमीच दागिन्यांचे आकर्षक डिझाईन उपलब्ध करून दिले असून त्यांना प्रत्येक वर्गातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ज्वेलरी डिझाईनमध्ये प्रत्येकाची पसंती लक्षात घेऊन सोने आणि हिऱ्यांचे आकर्षक आणि लेटेस्ट डिझाईन पाहावयास मिळते. आपल्या प्रिय व्यक्तीला भेट देण्यासाठी ही ज्वेलरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वस्त दरातील डायमंड ज्वेलरीचे वैशिष्ट्य म्हणजे व्हॅलेन्टाईन दिनानिमित्त भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहे. ज्वेलर्समध्ये ग्राहकांना त्यांच्या पसंतीची आकर्षक ज्वेलरी मिळते. शो रुममधील तज्ज्ञांचा सल्ला घेऊनही ग्राहक आपल्या डिझाईनचे बुकिंग करू शकतात. शोरूमचे संचालक प्रदीप कोठारी यांनी सांगितले की, हॉंगकॉंग आणि थायलँडवरून मागविण्यात आलेली मायक्रो सेटींग ज्वेलरीची मागणी अधिक आहे. भारतीय महिलांची पसंती लक्षात घेऊन ही ज्वेलरी खास ऑर्डर देऊन तयार करण्यात आली आहे. ही ज्वेलरी लाईट वेट असून प्रत्येकाच्या बजेटमध्ये आहे. शोरूममध्ये पार्किंगची सुविधा असून कोठारी ज्वेलर्सच्या तिन्ही शोरूममध्ये खास रेंज उपलब्ध आहेत. नववधूच्या शृंगारासाठी पारंपरिक डिझाईनची ज्वेलरी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. याशिवाय टेंपल ज्वेलरी उपलब्ध आहे. कोठारी ज्वेलर्समध्ये डिझाईनर्सची तज्ज्ञ चमू आहे. शोरूमचे संचालक ललित कोठारी यांनी विश्वसनीयता आणि नव्या डिझाईनमुळे कोठारी ज्वेलर्सला राष्ट्रीय पुरस्कार मिळत असल्याचे सांगितले.

Web Title: Valentine Special Collections at Kothari Jewelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.