वाजपेयी यांचा जन्मदिन 'सुप्रशासन दिन' म्हणून साजरा करणार - मोदी
By Admin | Updated: December 2, 2014 17:33 IST2014-12-02T17:33:11+5:302014-12-02T17:33:11+5:30
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन 'सुप्रशासन दिन' म्हणून साजरा करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली.

वाजपेयी यांचा जन्मदिन 'सुप्रशासन दिन' म्हणून साजरा करणार - मोदी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन 'सुप्रशासन दिन' म्हणून साजरा करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. मोदी हे भारतीय जनता पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीत बोलत होते त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
येत्या २५ डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार असल्याने माजी पंतप्रधान वाजपेयी यांचा जन्मदिवस सुप्रशासन दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या सर्व खासदारांनी २५ डिसेंबर हा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन 'सुप्रशासन दिन' म्हणून साजरा करण्यास सांगितले अशी माहिती संसदीय कार्यराज्यमंत्री राजीव प्रताप रूडी यांनी दिली. भाजपच्या सर्व खासदारांनी तसेच सर्व सरकारी कार्यालयांनी प्रतिकात्मक स्वरुपात सुप्रशासन दिन साजरा करावा. देशभरातील भाजप प्रणित सरकारांनी तसेच सरकारी संस्थांनी त्यादिवशी सुप्रशासनाचा आदर्श म्हणून काम करावे. तसेच सर्व भाजप खासदारांनी आपल्या मतदारसंघात एक तास "स्वच्छ भारत अभियान राबवावे अशा सुचना पंतप्रधान मोदी यांनी केल्या आहेत.