शुक्रवारपासून वायाळवाडी यात्रौत्सव
By Admin | Updated: April 18, 2016 00:47 IST2016-04-18T00:47:35+5:302016-04-18T00:47:35+5:30
बोटा : पठार भागातील कुरकुंडीच्या वायाळवाडी खंडोबाराया यात्रौत्सव व पिरसाहेब ऊरूस निमित्ताने शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवारपासून वायाळवाडी यात्रौत्सव
ब टा : पठार भागातील कुरकुंडीच्या वायाळवाडी खंडोबाराया यात्रौत्सव व पिरसाहेब ऊरूस निमित्ताने शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.वायाळवाडी येथे यात्रा व ऊरूसाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्याची परंपरा जपली जात आहे. शुक्रवारी सकाळी मांडव डहाळे, कलश स्थापना, सायंकाळी शेरणी, जागरण गोंधळ व त्यानंतर छबीना व संदल मिरवणूक होत आहे. रात्री लोककलेवर आधारित मायबोली महाराष्ट्राची हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. (वार्ताहर)