वैष्णोदेवीला दरड कोसळली, एकाचा मृत्यू
By Admin | Updated: August 24, 2016 13:42 IST2016-08-24T13:38:43+5:302016-08-24T13:42:33+5:30
वैष्णोदेवी मंदिराच्या गेटवर दरड कोसळली असून एका सीआरपीएफ कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. दरडीखाली काही भाविक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे

वैष्णोदेवीला दरड कोसळली, एकाचा मृत्यू
>
- ऑनलाइन लोकमत
जम्मू काश्मीर, दि. 24 - माता वैष्णोदेवी भवन येथे दरड कोसळली आहे. वैष्णोदेवी भवनच्या गेट नंबर 3 जवळ ही दुर्घटना घडली आहे. दरड अंगावर कोसळल्याने एका सीआरपीएफ कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. सीआरपीफच्या अधिका-यांनी मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. दरडीखाली काही भाविक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. सध्या वैष्णोदेवा यात्रा तात्पुरत्या काळासाठी थांबवण्यात आली आहे.