म्हापशात येथे स्वर अभिषेकी भाव संगीत महोत्सव
By Admin | Updated: April 4, 2015 01:55 IST2015-04-04T01:55:06+5:302015-04-04T01:55:06+5:30
बार्देस : म्हापसा येथे कै. दत्ताराम पालयेकर ट्रस्टतर्फे स्वर अभिषेकी भाव संगीत महोत्सव दि. ११ व १२ दरम्यान, येथील हनुमान नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.

म्हापशात येथे स्वर अभिषेकी भाव संगीत महोत्सव
ब र्देस : म्हापसा येथे कै. दत्ताराम पालयेकर ट्रस्टतर्फे स्वर अभिषेकी भाव संगीत महोत्सव दि. ११ व १२ दरम्यान, येथील हनुमान नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. ११ रोजी, सायंकाळी ५.३० वा. भाव अभिषेक हा कार्यक्रम होईल. यामध्ये रविंद्र साटे, प्रज्ञा देशपांडे, अक्षय नाईक हे कलाकार भाग घेतील. १२ रोजी, सकाळी ९ वा. अभंग अभिषेक कार्यक्रमात कार्तिकी गायकवाड, कल्याण गायकवाड, पं. उपेंद्र भट गायन सादर करतील. सायंकाळी ५.३० वा. नाट्य अभिषेक कार्यक्रमात पं. राजा काळे, शौनक अभिषेकी, गौरी पठारे हे कला सादर करतील. सूत्रसंचालन गोविंद भगत करतील. संकल्पना तरंगिनी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांचे आहे. दरम्यान, पं. राजा काळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष विनोद पालयेकर यांनी दिली. (प्रतिनिधी) फोटो : विनोद पालयेकर (०३०४-एमएपी-११)