India Pakistan Latest Update: पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधी धुडकावून लावल्यानंतर भारताने जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधानांच्या निवासस्थानी एक उच्च स्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत मोदींनी 'पाकिस्तानकडून गोळी आली, तर आपल्याकडून गोळ्याने उत्तर द्यायचं' असा स्पष्ट संदेश दिला. लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमधून भारताने तीन गोष्टी साध्य केल्याचे त्यांनी उदाहरण देऊन सांगितले. एएनआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एएनआयच्या रिपोर्टनुसार, पंतप्रधान मोदी बैठकीत म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही. जर त्यांनी गोळीबार केला, तर आपणही गोळीनेच उत्तर द्यायचं. त्यांनी हल्ला केला, तर आपणही हल्ल्यानेच उत्तर द्यायचं. वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा. त्यांच्या हवाई तळांवरील हल्ले, हा या ऑपरेशनमधील निर्णायक क्षण होता, असे ते म्हणाले.
हा भारताने दिलेला महत्त्वाचा मेसेज होता
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "मोदी बैठकीत म्हणाले की, 'बहावलपूरमधील जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावरील सर्वात घातक हल्ला होता. सगळ्यात शक्तिशाली अस्त्र त्यासाठी वापरलं गेलं. जैश ए मोहम्मदची निर्मिती आयएसआयने केलेली आहे आणि भारताने त्यांना हा महत्त्वाचा मेसेज दिला."
ऑपरेशन सिंदूरमधून तीन गोष्टी साध्य केल्या
सूत्रांनी सांगितले की, भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिमेतून तीन गोष्टी साध्य केल्या. लष्करी उद्दिष्ट म्हणजे पंतप्रधान मोदींनी मिट्टी मैं मिला देंगे म्हटलं होतं. बहावलपूर, मुरिदके आणि मुजफ्फराबादमधील अड्डे मातीत गाडले.
वाचा >>'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
दुसरं राजनैतिक उद्दिष्ट होतं, ते म्हणजे सिंधू जल कराराचा संबंध सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांशी आहे. जोपर्यंत सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया थांबत नाही, तोपर्यंत हा स्थगित राहील.
तिसरी गोष्ट म्हणजे घुस के मारेंगे. भारताने पाकिस्तान आतमध्ये शिरून त्यांच्या ह्रदयवरच हल्ला केला. ही मोहीम खूप यशस्वी ठरली आहे, असेही मोदी बैठकीत म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.