शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

खासदार होताच युसूफ अडचणीत; गुजरातमधील सरकारी भूखंडावर कब्जा केल्याप्रकरणी नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 12:20 IST

खासदार युसूफ पठाणच्या अडचणीत वाढ झाली आहे.

TMC MP Yusuf Pathan encroachment Notice : क्रिकेटपटू ते लोकसभा सदस्य असा प्रवास करणाऱ्या युसूफ पठाणच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याने पश्चिम बंगालमधील बहरामपूर लोकसभा जागेवरून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर खासदार होण्याचा मान पटकावला. दिग्गज काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना पराभूत करण्यात पठाणला यश आले. पण, गुजरातमधील सरकारी भूखंडावर कब्जा केल्याप्रकरणी युसूफ पठाणला नोटीस पाठवण्यात आली आहे. वडोदरा महानगरपालिकेने (VMC) युसूफ पठाणला नोटीस बजावून सरकारी जमिनीवरील अतिक्रमण काढण्यास सांगितले आहे. 

खरे तर युसूफ पठाणचे वडोदरा येथे आलिशान घर आहे, जे त्याने २०१४ च्या सुमारास बांधले. युसूफ पठाणवर कोणालाही माहिती न देता सरकारी भूखंडावर कब्जा केल्याचा आरोप आहे. युसूफ पठाण हा त्याचा भाऊ इरफान पठाणसोबत वडोदरा येथे राहतो. काँग्रेसचे दिग्गज नेते अधीर रंजन चौधरी यांचा पराभव करून युसूफ पठाण बहरामपूर मतदारसंघातून खासदार झाला. 

युसूफ पठाणच्या अडचणी वाढल्या TMC खासदार युसूफ पठाणवर भाजपचे माजी नगरसेवक विजय पवार यांनी सरकारी भूखंड हडपल्याचा आरोप केला आहे. पवार यांच्या आरोपानंतर वडोदरा महापालिकेने युसूफ पठाणला नोटीस बजावली आहे. वडोदरा महानगरपालिकेने हा भूखंड युसूफ पठाणला देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप विजय पवार यांचा आहे. 

तसेच याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता, मात्र राज्य सरकारने महामंडळाची शिफारस फेटाळून लावली. असे असतानाही युसूफ पठाणने भूखंड ताब्यात घेऊन घर बांधले. सध्या हा भूखंड युसूफ पठाणच्या ताब्यात आहे. अशा परिस्थितीत हे घर जमीनदोस्त करायला हवे, अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेवकाची आहे. युसूफ पठाणने या भूखंडावर घर बांधले त्यावेळी डॉ.ज्योती पांड्या या स्थानिक महापौर होत्या. त्यानंतर आयुक्तांनी हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. तोपर्यंत पठाण घराण्यातील कोणीही राजकारणात नव्हते.

टॅग्स :Yusuf Pathanयुसुफ पठाणTrinamool Congressतृणमूल काँग्रेसGujaratगुजरातMember of parliamentखासदार