शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

अचूक टायमिंग; YES बँकेवर निर्बंध घालण्यापूर्वीच गुजरातच्या कंपनीनं काढले २६५ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 09:54 IST

आरबीआयनं निर्बंध घालण्याच्या एक दिवस आधीच कंपनीनं काढले २६५ कोटी

ठळक मुद्देस्मार्ट सिटीशी संबंधित कंपनीनं काढले २६५ कोटीनिर्बंध लादले जाण्यापूर्वीच्या काही तासांमध्ये काढली रक्कमकंपनीच्या अचूक टायमिंगबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित

नवी दिल्ली: आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादल्यानं लाखो खातेधारक अडचणीत सापडले आहेत. येस बँकचे ग्राहक प्रति महिना ५० हजार रुपयेच काढू शकतात. रिझर्व्ह बँकेनं घातलेल्या निर्बंधांमुळे खातेधारकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. गुजरातमधल्या एका कंपनीनं मात्र रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लागू करण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी येस बँकेतून २६५ कोटी रुपये काढल्याची माहिती समोर आली आहे. या कंपनीनं साधलेल्या टायमिंगकडे संशयानं पाहिलं जात आहे. बडोदा पालिकेनं स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी स्थापन केलेल्या बडोदा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटनं येस बँकेवर निर्बंध लादले जाण्यापूर्वी २६५ कोटी रुपये काढले. ही रक्कम केंद्राकडून स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी पाठवण्यात आली होती, अशी माहिती बडोदा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बडोदा महापालिकेचे उपआयुक्त सुधीर पटेल यांनी दिली. 'केंद्रानं स्मार्ट प्रकल्पासाठी अनुदान दिलं. ती रक्कम आम्ही येस बँकेच्या स्थानिक शाखेत जमा केली होती. मात्र बँकेसमोर आर्थिक समस्या असल्याचं लक्षात येताच आम्ही तो निधी बँक ऑफ बडोदात जमा केला,' असं पटेल यांनी सांगितलं. आंध्र प्रदेशातल्या तिरुमला तिरुपती देवस्थानानंसुद्धा काही दिवसांपूर्वीच येस बँकेतून मोठी रक्कम काढली होती. तिरुपती देवस्थानानं येस बँकेतून १३०० कोटी रुपये काढले होते. ऑक्टोबरमध्ये तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाची बैठक झाली होती. त्यामध्ये येस बँकेत जमा असलेली रक्कम इतरत्र गुंतवण्याचा निर्णय झाला. तिरुमला तिरुपती देवस्थानाचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांनी काही बँकांच्या ताळेबंदांचा अहवाल पाहून त्यातले धोका लक्षात घेतले होते. त्यानंतर त्यांनी येस बँकेतली रक्कम काढण्याचा निर्णय घेतला.  

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकYes Bankयेस बँक