वडली खून खटल्याचे कामकाज सुरू

By Admin | Updated: March 22, 2016 00:41 IST2016-03-22T00:41:37+5:302016-03-22T00:41:37+5:30

जळगाव : जामनेर तालुक्यातील वडली येथील अफजल अब्दुल तडवी याच्या खून खटल्याच्या कामकाजास जिल्हा व सत्र न्यायालयात सुरुवात झाली आहे. सोमवारी या खटल्यात न्यायाधीश कुलकर्णी यांच्या न्यायालयात पहिला साक्षीदार सरदार दिलदार तडवी याची साक्ष नोंदवण्यात आली.

Vadli murder case continues | वडली खून खटल्याचे कामकाज सुरू

वडली खून खटल्याचे कामकाज सुरू

गाव : जामनेर तालुक्यातील वडली येथील अफजल अब्दुल तडवी याच्या खून खटल्याच्या कामकाजास जिल्हा व सत्र न्यायालयात सुरुवात झाली आहे. सोमवारी या खटल्यात न्यायाधीश कुलकर्णी यांच्या न्यायालयात पहिला साक्षीदार सरदार दिलदार तडवी याची साक्ष नोंदवण्यात आली.
८ फेबु्रवारी २०१५ रोजी अफजल तडवी हा जांभुळ शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेला असता, त्याच्या डोक्यावर कुर्‍हाडीने वार करण्यात आला होता. गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपीतर्फे ॲड.अनिल नेमाडे कामकाज पाहत आहे.

Web Title: Vadli murder case continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.