शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

काऊंटडाऊन सुरू... देशात कोरोना लसीकरणाची तारीख ठरली!

By मोरेश्वर येरम | Updated: January 5, 2021 17:35 IST

लसीकरण करणाऱ्या एका टीममध्ये ५ जणांचा समावेश असणार आहे.

ठळक मुद्देदेशात पुढील आठवड्यात लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यताकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली महत्वाची माहितीलसीकरणासाठी देशाची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचा केला दावा

नवी दिल्लीकोरोनावरील लशीला आपत्कालीन मंजुरी मिळाल्याच्या १० दिवसांच्या आत देशात लसीकरणाला सुरुवात होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं. त्यामुळे येत्या आठवड्यात देशात लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. 

केंद्र सरकारने देशाला 'न्यू इयर गिफ्ट' देत भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या कोवीशिल्ड लशीला ३ जानेवारी रोजी आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. या मंजुरीपासून १० दिवसांच्या आत म्हणजेच देशात १३ किंवा १४ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 

लसीकरण करणाऱ्या एका टीममध्ये ५ जणांचा समावेश असणार आहे. कोरोना लशीच्या साठ्याबाबत माहिती देताना राजेश भूषण यांनी देशात कर्नाल, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे प्राथमिक लस स्टोअर बनविण्यात आले आहेत. देशात असे एकूण ३७ लस साठवणुकीचे स्टोअर सज्ज आहेत. या ठिकाणांवर लस साठवली आणि तिथूनच इतर ठिकाणी वितरीत केली जाईल, असंही भूषण यांनी सांगितलं. देशात लशीच्या वाटपावर डिजिटल पद्धतीनं नियंत्रण ठेवलं जाणार आहे. गेल्या १० वर्षांपासूनच ही सुविधा भारतात उपलब्ध असल्याचं त्यांनी आवर्जुन सांगितलं. 

रुग्ण संख्येत घटदेशात कोरोनाला अटकाव घालण्यात यश येत असल्याचंही राजेश भूषण यांनी सांगितलं. गेल्या ११ दिवसांत दर दिवसाला ३०० हून कमी मृत्यू होत आहेत. देशात कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट केवळ १.९७ टक्के इतका असून एकूण पॉझिटीव्ह रुग्णांपैकी ४३.९६ टक्के रुग्णांवर रुग्णालय अथवा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर ५६.०४ टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस