शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लशीच्या तात्काळ वापराला आज मंजुरी मिळणार? तज्ज्ञांची महत्वाची बैठक सुरू

By मोरेश्वर येरम | Updated: January 1, 2021 13:52 IST

तज्ज्ञांच्या आजच्या बैठकीतून देशातील नागरिकांना खूशखबर मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकोरोनावरील लशीच्या वापराला तात्काळ मंजुरी मिळण्याची शक्यताकोविशील्डच्या लशीला आज मान्यता मिळणार?उद्यापासून देशातील प्रत्येक राज्यात 'ड्राय रन'

नवी दिल्लीकोरोनावरील लशीच्या बाबतीत होणाऱ्या तज्ज्ञांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत ऑफ्सफर्ड अॅस्ट्राझेनकाच्या कोविशील्ड लशीला देशात तात्काळ मंजुरी देण्याचा निर्णय होऊ शकतो. आतापर्यंत या समितीच्या दोन बैठका झाल्या आहेत. या बैठकीत कोरोना लशीची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून अधिक माहिती मागविण्यात आली होती. 

तज्ज्ञांच्या आजच्या बैठकीतून देशातील नागरिकांना खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. लस देण्याच्या मोहिमेचे संपूर्ण नियोजन तयार आहे. भारत जगातील सर्वात मोठी लस मोहीम राबवणारा देश ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

२ जानेवारी रोजी देशातील प्रत्येक राज्यात 'ड्राय रन'देशातील प्रत्येक राज्यात उद्या २ जानेवारीपासून 'ड्राय रन' करण्यात येणार आहे. यासाठीच्या तयारीचा आढावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन जाधव यांच्या उपस्थितीत एका बैठकीत घेण्यात येत आहे. याआधी पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाचे 'ड्राय रन' यशस्वीरित्या घेण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यात ३० कोटी जनतेला लसदेशात लशीकरण्याच्या पहिल्या टप्प्यात जवळपास ३० कोटी लोकांना लस देण्यात येणार आहे. भारतात  सध्या कोरोनावरील लशींची सध्याची परिस्थिती काय? याची माहिती जाणून घेऊयात...>> ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेनकाची कोविशील्ड लस तयार>> भारत बायोटेक आणि आयसीएमआरची कोवॅक्सीन लस देखील तयार आहे. >> दोन्ही लशींच्या तात्काळ वापराला कोणत्याही क्षणी मंजुरी मिळू शकते. >> अमेरिकेच्या फायझर कंपनीचीही लस तयार >> फायझरची लस देखील भारतात उपलब्ध होणार>> तज्ज्ञांच्या समितीने फायझरकडून लशीसंदर्भात आणखी काही माहिती मागवली आहे. >> माहिती मिळाल्यानंतर फायझरच्या लशीच्या वापरालाही भारतात मंजुरी मिळेल. >> झायडस कॅडीला देखील लशीची निर्मिती करत आहे. >> झायडसच्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सध्या सुरू आहे. 

दरम्यान, पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूटमध्ये कोविशील्डच्या लशीचे तब्बल ५ कोटी डोस मंजुरी मिळण्याआधीच तयार देखील झाले आहेत. यावरुन लस निर्मितीच्या वेगाची कल्पना येईल. कोरोनावरील लस निर्मितीचं भारत हे केंद्र ठरत असून देशात जगातील सर्वात मोठ्या लशीकरणाच्या मोहिमेची लवकरच घोषणा होऊ शकते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यासंबंधीची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस