शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
2
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
3
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
4
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
5
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
7
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
8
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
9
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
10
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
11
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
12
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
13
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
14
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
15
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
16
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
17
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
18
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
19
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
20
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?

एका दिवसात 15 लाख लोकांना लस, १८ हजारांहून अधिक नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2021 6:14 AM

१८ हजारांहून अधिक नवे रुग्ण; १ लाख ८० हजार रुग्णांवर उपचार सुरू, बरे झालेल्यांचे प्रमाण ९७.९८%

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशात तब्बल ३६ दिवसांनी शनिवारी कोरोनाचे १८ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले. सलग चार दिवसांपासून उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढत असून, तो आकडा १ लाख ८० हजारांवर पोहोचला आहे. मात्र बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढून ते ९७.९८ टक्के झाले. देशात शुक्रवारी सुमारे १५ लाख लोकांना लस देण्यात आली.

गेल्या २९ जानेवारी रोजी १८,८५५ नवे रुग्ण आढळले होते. त्यापेक्षा शनिवारचा आकडा पाचशेने कमी आहे.  कोरोनामुळे शनिवारी आणखी १०८ जण मरण पावले असून, बळींची संख्या १ लाख ५७ हजारपेक्षा अधिक झाली आहे. कोरोनाचे १ कोटी ११ लाख ९२ हजार रुग्ण असून, त्यातील १ कोटी ८ लाख ५४ हजार जण बरे झाले आहेत. कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.४१ टक्के आहे. उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण वाढून १.६१ टक्के झाले आहे. 

महाराष्ट्रातील प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारकमहाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांनी कोरोना झाला नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचा निर्णय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी घेतला. महाराष्ट्रात कोरोना साथीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर असल्याने हा निर्णय घेतल्याचे मध्य प्रदेश सरकारच्या सूत्रांनी सांगितले.

बहुस्तरीय मास्क संसर्ग रोखण्यात अधिक प्रभावी

n    बहुस्तरीय मास्क हे हवेतून जंतूंचा होणारा संसर्ग रोखण्यासाठी अधिक प्रभावी असतात, असे बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या संशोधकांनी केलेल्या एका पाहणीत आढळून आले. n    या पाहणीमध्ये अमेरिकेच्या दोन शिक्षण संस्थाही सामील झाल्या होत्या. कोरोना विषाणूंचे नवीन प्रकार आढळून आले असून, त्यांची संसर्गशक्ती अधिक आहे. त्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली. 

१ कोटी ९४ लाख लोकांना कोरोना लस देशात शुक्रवारी सुमारे १५ लाख लोकांना लस देण्यात आली. कोरोना लसीकरण मोहिमेतील एका दिवसात लस दिलेल्यांचा हा सर्वाधिक आकडा आहे.आजवर १ कोटी ९४ लाख लोकांना कोरोना लस देण्यात आली. १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला होता. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या