वायाळमळा शाळेस आएसओ प्रमाणप्रत्र
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:13+5:302015-02-18T00:13:13+5:30
अवसरी बुद्रुक : वायाळमळा (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या हस्ते आय.एस.ओ. प्रमाणपत्र देण्यात आले.

वायाळमळा शाळेस आएसओ प्रमाणप्रत्र
अ सरी बुद्रुक : वायाळमळा (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या हस्ते आय.एस.ओ. प्रमाणपत्र देण्यात आले.जिल्हा परिषद पुणे येथे आय.एस.ओ. प्रमाणपत्र देण्यात आले. शाळेला भौतिक सुविधा पुरविण्यासाठी पुणे वेल्फेअर संस्था व वायाळमळा ग्रामस्थ यांनी आर्थिक मदत केली. त्यांच्या सहकार्यामुळे शाळेला आय.एस.ओ. प्रमाणपत्र मिळण्यास मदत झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. आय.एस.ओ.प्रमाणपत्र प्रदान करतेवेळी वेल्फेअरचे अध्यक्ष गणपत वायळ, लहू वायळ, डॉ.महेश वायळ, कचरूशेठ वायळ, रमेश वायळ व सर्व सदस्य उपस्थित होते. अवसरी खुर्दचे उपसरपंच मंजूषा वायळ, गणेश वायळ, कैलास वायळ, संजय वायळ, केंद्र प्रमुख सलीम इनामदार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय भीमाजी वायळ, संदेश शेलार, वैभव वायळ, तान्हाजी वायळ, मुकुंद वायळ, मुख्याध्यापक अनिल गावडे, ललिता काळे यांच्या उपस्थितीत आय.एस.ओ.मानांकन देण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन योगेश वायळ यांनी केले. (वार्ताहर)छायाचित्र मजकूर: वायाळमळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांच्या हस्ते आय.एस.ओ. प्रमाणपत्र देण्यात आले.