शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांना बाहेर काढण्यासाठी आता घेणार ‘रॅट-होल’ची मदत, हाताने खोदकाम करणार; NDMAची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 06:14 IST

Uttarkashi Tunnel Accident: उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात १६ दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी डोंगरावरून ड्रिलिंग सुरू असताना लवकरच हाताने खोदकाम करून कामगारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) दिली.

नवी दिल्ली/उत्तरकाशी - उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात १६ दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी डोंगरावरून ड्रिलिंग सुरू असताना लवकरच हाताने खोदकाम करून कामगारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) दिली.ऑगर मशिनमध्ये बिघाड झाल्यानंतर आता हाताने खोदकाम केले जाणार आहे. ऑगरने ४६.८ मीटरपर्यंत आडवे खोदकाम करण्यात आले होते. उभे आणि हाताने खोदकाम करण्यावर सध्या लक्ष केंद्रित केले जात आहे. बोगद्याच्या बारकोटच्या टोकापासून आडवे ड्रिलिंग करण्याचा पर्यायांवरही विचार केला जात आहे.

पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांचा आढावापंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी सोमवारी सिलक्यारा बोगदा गाठत गेल्या दोन आठवड्यांपासून अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला. मिश्रा यांनी बचावकार्याची गुंतागुंत समजून घेतली आणि अधिकारी, अभियंते आणि कामगारांशी बोलून त्यांना प्रोत्साहन दिले.

‘बांधकामाशी  संबंध नाही’बोगद्याच्या बांधकामात आमचा सहभाग नाही. बांधकामातील कंपनीमध्ये समूहाची भागीदारी नाही, असे उद्योगपती गौतम अदानी यांच्या समूहाने स्पष्ट केले. बांधकामात समूहाचा सहभाग असल्याचा संशय समाजमाध्यमांवर व्यक्त केला जात असताना अदानी समूहाने हे स्पष्टीकरण दिले.

८६ मीटर उभे ड्रिलिंग बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी करण्यात येणार आहेत. १.२ मीटर व्यासाचा पाइप बोगद्याच्या वरून खालपर्यंत उभा घातला जाईल. 

‘रॅट-होल’ खाण कामगार लवकरच हाताने खोदण्यास सुरुवात करतील. ऑगर मशीनचे तुटलेले भाग काढण्यात आले आहेत. खासगी आणि सार्वजनिक संस्था बचावकार्यात आहेत.-सय्यद अता हसनैन, सदस्य, एनडीएमए

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडAccidentअपघात