शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

भयंकर! उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, जोशीमठ धरण फुटलं; अनेक जण वाहून गेल्याची भीती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 13:17 IST

यात अनेक जण वाहून गेल्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. यात जे लोक वाहून गेल्याचे बोलले जात आहेत ते खालच्या बाजूला राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. (Joshimath dam)

उत्तराखंडमधील जोशीमठ येथे मोठी दूर्घटना घडली आहे. येथे ग्लेशर कोसळल्याने धरण फुटल्याची (Dam Broken in Uttarakhand Joshimath) घटना घडली आहे. यात अनेक जण वाहून गेल्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. यात जे लोक वाहून गेल्याचे बोलले जात आहेत ते खालच्या बाजूला राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. (Uttarakhand Joshimath dam broken alert issued to Haridwar)कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका -रावत म्हणाले, टचमोली जिल्ह्यातून आपत्ती आल्याचे वृत्त समजते. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच आपत्ती व्यवस्थापनाला या आपत्तीचा सामना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. सरकार सर्वप्रकारची आवश्यक ती पावले उचलत आहे.’

सांगण्यात येते, की तपोवनच्या वरच्या बाजूला असलेल्या एका नदीमुळे ही आपत्ती ओढवली आहे. ज्या नदीचा उल्लेख केला जात आहे, तिला धौली गंगा नावानेही ओळखले जाते. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनीही दुजोरा दिला आहे.

हरिद्वारपर्यंत अलर्ट जारी -पोस्ट जोशीमठ येथील हेड कॉन्स्टेबल मंगल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 वाजून 55 मिनिटांनी जोशीमठ पोलीस ठाण्यातून रैणी गावात हिमकडा कोसळल्याची माहिती मिळाली होती. यानंतर हरिद्वारपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ऋषिगंगा पावर प्रोजेक्टचे मोठे नुकसान -उत्तराखंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपोवन रैणी भागात हिमकडा कोसळल्याने ऋषिगंगा पावर प्रोजेक्टचे मोठे नुकसान झाले आहे. नदीची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. यामुळे अलकनंदा नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी लवकरात लवकर सुरक्षित स्थळी पोहोचावे. चमोली पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी नंबरदेखील जारी केला आहे. चमोली पोलिसांनी जारी हेल्पलाईन -व्हर्चुअल पोलीस स्टेशन जनपद चमोलीWhatsapp 9458322120,FaceBook chamoli police,Twitter @chamolipolice @SP_chamoli,Instagram chamoli_police

टॅग्स :Damधरणfloodपूर