शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
4
काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
6
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
7
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
8
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
9
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
10
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
11
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
12
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
13
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
14
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
15
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
16
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
17
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
19
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
20
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी

Kumbh Mela 2021: कुंभमेळ्यात लाखोंची गर्दी, कोरोना नियमांच्या चिंधड्या; अनेक साधू कोरोना पॉझिटिव्ह!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 13:28 IST

मोठी गर्दी असल्याने अनेक ठिकाणी कोरोना नियमांचेही उल्लंघण होतानाही दिसून आले. येथे ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत आहे, ना कुणी मास्क लावताना दिसत आहे. (kumbh 2021 second shahi snan)

नवी दिल्ली - हरिद्वार येथे आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यात (kumbh 2021) आज दुसरे शाही स्नान होत आहे. या शाही स्नानासाठी अनेक अखाड्यांतील साधू-संत आले आहेत. यावेळी कोरोना नियमांच्या पार चिंधड्या उडाल्याचे पाहायला मिळाले. अनेक साधूही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. असे असतानाही उतराखंड (Uttarakhand) पोलीस कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्यात अक्षम दिसत आहे. (Uttarakhand Haridwar kumbh 2021 second shahi snan somvati amavasya)

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

दीपक रावत यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले, की सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. 50 हजार लोकांची टेस्ट करण्यात येत आहे. अनेक साधू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आणखीही टेस्ट करण्यात येत आहे. हे सर्व आव्हानात्मक आहे. मात्र, लोकांनी नियमांचे पाल करावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. 

ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंगचं पालन -मोठी गर्दी असल्याने अनेक ठिकाणी कोरोना नियमांचेही उल्लंघण होतानाही दिसून आले. येथे ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत आहे, ना कुणी मास्क लावताना दिसत आहे. कुंभ मेळ्याचे आयजी संजय गुंज्याल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाही स्नानासाठी सर्वात पहिले अखाड्यांना परवानगी देण्यात आली. यानंतर 7 वाजल्यापासून सामान्य जनतेला स्नानाची परवानगी देण्यात आली. 

कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही घातक; माणूस राहिला तरच आस्था टिकेल; रमजानवर योगी म्हणाले...

संजय गुंज्याल म्हणाले - आज नियमांचे पालन करणे कठीण -कुंभमेळा आयजी संजय गुंज्याल यांनी म्हटले आहे, की आम्ही लोकांना सातत्याने कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहोत. मात्र, आज मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने चालान देणे व्यवहारिक दृष्ट्या अश्यक्य आहे. घाटांवर कोरोना नियमांची अंमलबजावणी करणे अत्यंत कठीण आहे. आम्ही सोशल डिस्टंसिंगची अंमलबजावणी करायला सुरुवात केली, तर धावपळही उडू शकते.

शाही स्नानापूर्वीच 1333 पॉझिटिव्ह -शाही स्नानाच्या एक दिवस आधीच उत्तराखंडमधून कोरोना रुग्णांचे भीतीदायक आकडे समोर येऊ लागले आहेत. गेल्या 24 तासांत 1,333 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देहरादूनमध्ये 582, हरिद्वारमध्ये 386, नैनीताल येथे 122 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर हर की पौडी येथे रविवारी 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

चिनी अधिकाऱ्यानंच केली त्यांच्या कोरोना लशीची 'पोल-खोल'; जिनपिंग सरकारनं उचललं असं पाऊल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKumbh Melaकुंभ मेळा